मुंबई-पुण्यात T20 वर्ल्ड कप घेण्यास बीसीसीआय इच्छुक, पण शिवसेनेच्या भूमिकेची चिंता

बीसीसीआयसमोर कोरोनापेक्षा आणखी एक मोठी अडचण

मुंबई-पुण्यात T20 वर्ल्ड कप घेण्यास बीसीसीआय इच्छुक, पण शिवसेनेच्या भूमिकेची चिंता

मुंबई, २९ मे:  शनिवारी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाची बैठक पार पडली. बीसीसीआयच्या या बैठकीत  टी २० वर्ल्ड कपचे आयोजन आणि आयपीएल स्पर्धेतील (IPL 2021) उर्वरित सामने यासंदर्भात चर्चा झाली. त्यानंतर आता आयपीएल स्पर्धेचा विषय आता निकाली लागला असून, आयपीएलचे उर्वरित ३१ सामने हे युएईमध्ये खेळवण्यात येतील असा निर्णय या विषयावर एकमताने घेण्यात आला आहे.

टी २० वर्ल्ड कपच्या आयोजनाबाबत निर्णय

टी २० वर्ल्ड कपच्या आयोजनाबाबत आणखी एक महिन्याची मुदत आयसीसीला मागण्याचा निर्णय या बैठकीत झाला असून, आयसीसीची बैठक १ जून रोजी होणार आहे. या बैठकीत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा हे उपस्थित राहणार आहेत. बीसीसीआयच्या शनिवारच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती ते आयसीसीला देणार असून, टी २० वर्ल्ड कपच्या आयोजनाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी १  जुलैपर्यंत बीसीसीआय मुदत घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

बीसीसीआयसमोर कोरोनापेक्षा आणखी एक मोठी अडचण

भारतामध्ये टी वर्ल्ड कप आयोजित झाल्यास तो महाराष्ट्रात घेण्याचा सर्वोत्तम पर्याय बीसीसीआयसमोर असणार आहे. मुंबई आणि पुण्यात मिळून ४ स्टेडियम आहेत. या स्टेडियम्स मध्ये सामने खेळवता येतील. महत्वाची बाब म्हणजे या ठिकाणी सामने झाल्यास खेळाडूंना विमान प्रवासाची देखील गरज लागणार नाही, त्यामुळे कोरोनाची अडचण देखील कमी होईल. परंतु, या आयोजनात कोरोनापेक्षा आणखी एक मोठी अडचण बीसीसीआयसमोर असणार आहे. मुंबई किंवा महाराष्ट्रात किंवा मुंबईमध्ये पाकिस्तानचा एकही सामना होऊ न देण्याची शिवसेनेची भूमिका आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या भूमिकेसाठी शेवटपर्यंत आग्रही होते. टी २० वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानची टीम भारतामध्ये येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पाकिस्तानचे सामने खेळवण्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार, याची बीसीसीआयला चिंता आहे. १९९१ साली मुंबईत होणारी पाकिस्तानची मॅच रद्द करण्यासाठी तेव्हा शिवसेनेत असलेले नेते शिशिर शिंदे यांनी वानखेडेची स्टेडियमची खेळपट्टी उखडून टाकली होती. शिवसेनेच्या विरोधामुळे गेल्या तीन दशकापासून  महाराष्ट्रात पाकिस्तानची एकही मॅच झालेली नाही.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.