अंतिम वर्षाच्या परीक्षेचा फॉर्म भरायचा राहिलाय, हे नक्की वाचा.

1 min read

अंतिम वर्षाच्या परीक्षेचा फॉर्म भरायचा राहिलाय, हे नक्की वाचा.

अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठांना शासन सर्वतोपरी सहकार्य करेल- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

RNO/मुंबई: अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठांना शासन सर्वतोपरी सहकार्य करेल असे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज संगितले. आज मुंबई विद्यापीठात परिक्षेसंदर्भातील आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. सामंत म्हणाले, मुंबई विद्यापीठामध्ये अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या राज्यात सर्वाधिक आहे. परीक्षा घेत असताना परीक्षेच्या प्रक्रियेतून एकही विद्यार्थी सुटता कामा नये, त्यासाठी विद्यापीठ विशेष प्रयत्न करीत आहे.
यामध्ये विद्यापीठाकडून सर्व शक्यतांचा अभ्यास करून नियोजन करण्यात आलेले आहे. तसेच सराव प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे. अंतिम वर्षाच्या ज्या विद्यार्थ्यांनी आपला परीक्षा अर्ज भरलेला नाही. त्यांच्यासाठी विशेष बाब म्हणून विद्यापीठाने दिनांक १८,१९,२० सप्टेंबर २०२० रोजीचा वाढीव कालावधी दिलेला आहे. या वाढीव तीन दिवसांच्या कालावधीचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.