हुंड्यासाठी सुनेला मारहाण; जिवे मारण्याची धमकी

शिक्षिका सासूसह तिघांवर गुन्हे दाखल 

हुंड्यासाठी सुनेला मारहाण; जिवे मारण्याची धमकी

परभणी : हुंड्यासाठी सुनेचा शारीरिक आणि मानसिक छळ करणाऱ्या सासूसह तिघांविरूद्ध अकोल्यातील खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परभणी शहरातील वैभवनगर येथील रहिवाशी रेखा अशोक मस्के यांचा मुलगा राजरत्न मस्के याच्याशी अकोला येथील एका तरुणीचा एका वर्षापूर्वी विवाह झाला. विवाहाला घरच्या मंडळींनी सहमती दिली. मात्र काही दिवसांतच सासू रेखा मस्के ही सुनेला माहेराहून चार लाख रूपये आण; अन्यथा तू आम्हाला पसंत नाहीस, असे म्हणून मानसिक त्रास सुरू केला. आईच्या होकारास हो देत उच्चशिक्षित तथा पिडीत महिलेचा पती राजरतन मस्के यानेही पत्नीला शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. विवाहीतेने अकोला येथील खदान पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.

तक्रारीवरून अकोला पोलीस ठाण्यात सासू रेखा अशोक मस्के, पती राजरतन अशोक मस्के, सासरा अशोक मस्के यांच्याविरुद्ध कलम ४९८ अ, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादंविप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.