Beed Corona Update:  कोरोनाचा जिल्ह्यात चौथा बळी, जिल्ह्यात 20 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु

1 min read

Beed Corona Update: कोरोनाचा जिल्ह्यात चौथा बळी, जिल्ह्यात 20 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु

औरंगाबादला उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या 57 वर्षीय महिलेच्या मृत्यू झाला. तिचा कोरोना अहवाल 5 जूनला पॉझिटिव्ह आला होता.

बीड : जिल्ह्यात आतापर्यंत 2256 रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी 96 रुग्ण पॉझिटीव्ह आले असून 72 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 20 रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर आता पर्यंत 4 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. मधूमेह, रक्तदाब, न्यूमेनिया, किडनीचा आजार असलेल्या परळी तालूक्यातील 57 वर्षीय महिलेचा गुरुवारी सकाळी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तिला उपचारासाठी औरंगाबादच्या एमजीएम रुग्णालयात दाखल केले होते. तिचा 5 जून रोजी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

आता पर्यंत मृत्यू झालेल्या व्यक्तींचा तपशील
सांगवी पाटण, ता. आष्टी 1 रुग्णाचा मृत्यू
जगातकर गल्ली, परळी 1 रुग्णाचा मृत्यू
मातावळी, ता. आष्टी 1 रुग्णाचा मृत्यू
माळेगाव, ता केज 1 रुग्णाचा मृत्यू