बीडच्या शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग एका एकरात लाखोंचे उत्पन्न.

1 min read

बीडच्या शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग एका एकरात लाखोंचे उत्पन्न.

पारंपारिक शेतीला फाटा देत शेतक-्याचा अनोखा प्रयोग

वृत्तसंस्था/बीड : पारंपारिक शेतीला फाटा देत दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी आता कापूस, सोयाबीन पिकांकडे पाठ फिरवत शतावरी पीक लागवडी कडे वळले आहेत. दुष्काळाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी शेतकरी आता शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत.
असाच एक प्रयोग बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील डोनगाव येथील शेतकरी धनराज भुसारे यांनी केला आहे. एका एकर मध्ये शतावरीचं पिक घेतल, खर्च कमी आणि उत्पन्न जास्त मिळत असल्यानं, त्यांनी एका खाजगी कंपनीशी करार करून शतावरीची लागवड करून अठरा महिन्यात दहा लाख रुपयांचं उत्पन्न मिळवलं आहे. भुसारे पारंपरिक शेती करत होते. माञ अशातच त्यांनी शतावरी लागवडीची माहिती घेऊन, याची लागवड केली आणि भरघोस उत्पन्न घेतले असे समर्थ ऍग्रो कंपनीच्या मॅनेजर शितल खाटपे यांनी बोलतांना सांगितले मराठवाड्यातील शेतकरी आज अनेक अडचणींना सामोरे जात आहे. मात्र शेतकऱ्यांनी योग्य माहिती, योग्य नियोजन करून प्रगत शेतीची कास धरली तर नक्कीच त्याचा फायदा होतो हेच दुष्काळी बीड जिल्ह्यातील धनराज भुसारे यांनी करून दाखवले आहे.