बीडमध्ये 18 दिवसात कोरोनाग्रस्तांची संख्या 62 वर

1 min read

बीडमध्ये 18 दिवसात कोरोनाग्रस्तांची संख्या 62 वर

स्वप्निल कुमावत/बीड– राज्य सरकारने नागरिकांना स्वजिल्ह्यात जाण्याची परवानगी देताच. बीडमध्ये अवघ्या 18 दिवसात कोरोनाग्रस्तांची संख्या 62 वर जाऊन पोहोचली. आरोग्य प्रशासनाने घेतलेल्या मेहनतीमुळे 52 कोरोनाग्रस्त रूग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. आज आणखी चार कोरोनाग्रस्तांना डिस्चार्च देण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात उपचार घेणा-या रुग्णांची संख्या सहा वर येऊ शकते.असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी सांगितले.
डॉ.अशोक थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यात बीड 2,पाटोदा 2,गेवराई 1,धारुर 4, आणि परळी 1 अशाप्रकारे 10 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
परळी येथील एका पाँझिटिव्ह रूग्णांच्या संपर्कात आल्याने तेथील काही नागरिकांना क्वारंटाईन केले गेले आहे. रविवारी 75 जणांचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. या अहवालकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे