कच्च्या केळी खाण्याचे फायदे

कच्च्या केळी खाण्याचे फायदे

केळी खाण्याचे अनेक फायदे तुम्हाला माहित असतील परंतु कच्ची केळी खाण्याचे काय फायदे आहेत हे माहित नसावे. केळी बाजारामध्ये वर्षभर उपलब्ध असते, केळीचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत मात्र पिकलेल्या केळीपेक्षा कच्च्या केळीपासून जास्त फायदे होतात.कच्च्या केळांमध्ये पोटॅशियमचा खजाना असतो. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती आणखी सक्षम करण्यासोबतच दिवसभर उत्साह टिकून राहण्यास मदत मिळते.

कच्ची केळी खाण्याचे फायदे

1) वजन घटवण्यास मदत-

वजन घटवण्याचा अटोकाट प्रयत्न करणारे केळी खाणं टाळतात. मात्र कच्ची खेळी खाल्ल्यामुळे वजन घटवण्यास मदत होते. कच्चं केळ हा तंतूमय पदार्थांचा महत्त्वाचा स्त्रोत आहे. ज्यामुळे अनावश्यक फॅट आणि शरिरातील अशुद्धी स्वच्छ होण्यास मदत मिळते.

2) बद्धकोष्ठतेपासून मुक्ती-

कच्च्या केळात फायबर आणि आरोग्यदायी स्टार्च असतं. त्यामुळे आतड्यांमध्ये काहीही न अडकू देता, ते स्वच्छ ठेवण्यास मदत होते. त्यामुळे जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर रोज कच्चं केळ खाणं फायदेशीर ठरू शकतं.

3) भूख नियंत्रित -

कच्च्या केळामुळे भूख नियंत्रित करणं, शांत करण्यास मदत मिळते. वेळी-अवेळी भूक लागत नाही. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम म्हणजे जंक फूड किंवा फास्ट फूडकडे आपण वळत नाही.

4) मधुमेहावर नियंत्रण

मधुमेहाचा त्रास असणाऱ्या रुग्णांनाही कच्ची केळी फायदेशीर ठरू शकते. मधुमेह प्राथमिक स्तरावर असेल, तर कच्ची केळी खाणं सुरु करा. मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यास मदत होऊ शकते.

5) पचनक्रिया सुधारते

कच्च्या केळ्याच्या नियमित सेवनाने पचनक्रिया सुधारते. शरीरातील मलनि:सारण प्रक्रिया नीट होते. याशिवाय कच्च्या तेलामुळे हाडं मजबूत बनण्यासही मदत होते.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.