सर्वोत्तम मुख्यमंत्री: योगी आदित्यनाथ पहिल्या स्थानावर तर उध्दव ठाकरे

1 min read

सर्वोत्तम मुख्यमंत्री: योगी आदित्यनाथ पहिल्या स्थानावर तर उध्दव ठाकरे

‘ मुव्ह ऑफ द नेशन’ सर्वे

कोरोना व्हायरसची परिस्थिती व्यवस्थित हाताळणा-या राज्यप्रमुखांचा म्हणजेच मुख्यंत्र्याचा सर्वे करण्यात आला.‘ मुव्ह ऑफ द नेशन’ असं या सर्वे च नाव आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सर्वोत्तम मुख्यमंत्री ठरत पहिल्या स्थानावर आहेत.तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे पाचव्या स्थानावर आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

इंडिया टुडे आणि कार्वी इनसाइटसने संयुक्तपणे केलेल्या मुव्ह ऑफ द नेशन या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष काढण्यात आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 24% लोकांनी आपलं मत नोंदवत पसंती दिली आहे. तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे 7% पसंती दिली आहे. ते पाचव्या स्थानावर आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 15% सह दुस-या स्थानावर, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी 11% तिस-या, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी 9% चौथ्या तर 7% सह मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार पाचव्या स्थानावर आहेत.