सावधान... सायबर गुन्हेगारांचा फसवणुकीसाठी नवा फंडा

1 min read

सावधान... सायबर गुन्हेगारांचा फसवणुकीसाठी नवा फंडा

अशाप्रकारच्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी काय दक्षता घ्यावी.

सुमित दंडुके/औरंगाबाद.दि.०६ : सध्या भारतामध्ये तसेच महाराष्ट्रात सायबर गुन्हेगारांनी फसवणुक करण्यासाठी नवीन फंडा शोधुन काढला आहे. आणि या नवीन फसवणुक प्रकारातुन अनेक नागरिकांना आर्थिक नुकसान पोहचवित आहेत. पुर्वी सायबर गुन्हेगार हे नागरिकांना फसविण्यासाठी OTP, UPI LINK इ. अनेक प्रकाराचा वापर करायचे. परंतु सध्या सायबर गुन्हेगारांनी या जुन्या पध्दती सोडुन सगळयात वेगळे असे स्क्रिन शेअरिंग अ‍ॅप उदा. Anydesk, quick support, airdroid, TeamViewer अशा अ‍ॅपचा वापर करीत आहेत.
सायबर गुन्हेगार हे आपल्याला आपल्या मोबाईल हॅण्डसेट मध्ये किंवा संगणकामध्ये संबधित अ‍ॅप Install करण्यासाठी सांगतात. संबधित अ‍ॅप Install केल्यानंतर तात्काळं आपल्या मोबाईल ला सायबर गुन्हेगार हे remotely access करुंन घेतात. आपल्या मोबाईलचा अ‍ॅक्सेस सायबर गुन्हेगाराकडे गेल्यानंतर आपल्या मोबाईल हॅण्डसेटद्वारे सायबर गुन्हेगारांना आपले कार्ड डिटेल्स, OTP, UPI PIN, असे सर्व त्यांच्याकडे जातात. आणि आपल्या मोबाईल वर येणारे बँकेचे OTP चा वापर ते फ्रॉड ट्रान्झेक्शन साठी करतात. व आपल्या मोबाईल मध्ये असणारे उदा. पेटीएम, फोनपे, गुगलपे असे इतर वॉलेटचा अ‍ॅक्सेस घेऊन सुध्दा ते फ्रॉड ट्रान्झेक्शन करुं शकतात.

अशाप्रकारच्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी काय दक्षता घ्यावी :

 1. कोणत्याही अनोळंखी व्यक्तींचा सांगण्यावरुंन आपल्या मोबाईल मध्ये किंवा संगणकामध्ये
 • Remotely access app
 • Anydesk,
 • Quick support,
 • Airdroid,
 • TeamViewer
  इ. अ‍ॅप डाऊनलोड करुं नयेत.
 1. कोणतेही अ‍ॅप डाऊनलोड करीत असतांना त्यांचे फायदे व तोटे याची खात्री करूनच अ‍ॅप डाऊनलोड करावे.

 2. आपल्या बँकेतील (डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/वॉलेट ची माहिती तसेच आपल्या मोबाईल वर येणारे OTP/Verification Code शेयर करुं नये.

 3. आपल्या Paytm चे kyc verification करावयाचे असल्यास आपल्या Paytm app मध्ये दिलेल्या Nearby option वर जाऊन आपल्या जवळं असणारे पेटीएम सेंटरशी संपर्क साधावा.