"कोरोना सैतानाने निर्माण केलाय " अस सांगणा-यांपासून सावध रहा - पंकज वंजारे

कपाळावर चिकटवले नाणे , यज्ञातून ऑक्सिजन निर्माण करण्यासाठी दिले आव्हान

"कोरोना सैतानाने निर्माण केलाय " अस सांगणा-यांपासून सावध रहा - पंकज वंजारे

औरंगाबाद- कोरोना वायरस हा सैतानाने निर्माण केलाय . त्याला संपवायच असेल, दूर ठेवायचंय असेल तर येशूला शरण जा. अस टांझानिया येथील सत्ताधारी सांगतात आणि ते जगभर पसरत. ताफून ( महामारी ) सैतान पसरवतो , अस मुस्लिम बांधवांमध्ये पसरवल्या जातय. यामुळे वैद्यकीय उपचाराकडे दुर्लक्ष होऊ शकत. यावर विश्वास न ठेवता . अशा लोकांपासून सावध रहा , वैद्यकीय उपचार घ्या . असे आवाहन .अंनिसचे राज्य युवा संघटक पंकज वंजारे यांनी केले.

जगभ-यात कोरोना आजारा संदर्भात विविध धर्मातील मान्यता, अंधश्रध्दांवर प्रहार करत पंकज वंजारे पुढे म्हणाले की , अचिकित्सक विचार पध्दती, शब्द आणि ग्रंथप्रामाण्यातून अंधश्रध्दा जन्माला येतात. हे सत्य पुन्हा एकदा कोरोना देवी , अम्मा यांच्या व त्यांच्या मंदिरांच्या निर्मितीने सिद्ध केलय . देव , देवी प्रसन्न राहीले किंवा झाल्यास , आपल्यावर आलेल्या संकटांना ते दुर करतात . अशी समज असलेल्या संस्कारातून रुजत आलेल्या परंपरागत मान्यतेनेच घात केला. यातूनच कोरोना संपवण्यासाठी काहींनी आपले अवयव देवीला अर्पण केलेत तर कुठे हजारो कोंबड्या बक-यांचे बळी देण्यात आले . दैवीशक्तीने मांत्रिक , बाबा , देवी हे आपला आजार दुरुस्त करेल या अंधश्रध्देने अनेकांचे बळी घेतलेत. समाजमाध्यमांवरील संदेश , विडीओ वर विश्वास ठेवत अनेकांनी अवैज्ञानिक उपाय स्वतःवर करत व ते संदेश इतरांपर्यंत पोहचवत स्वतःसह इतरांचेही प्राण धोक्यात आनलेत. वैद्यकीय जागृती झाली असती आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला असता तर हे सर्व टाळता आले असते , असे ते म्हणाले. गोमूत्र पिल्याने , मंत्राने कोरोना दुरुस्त होतो. हा केला जाणारा दावा पंकज वंजारे यांनी संत ज्ञानेश्वर, वि. दा. सावरकर यांच्या लिखाणाचे संदर्भ देत सहपुरावा खोडून काढत, अ. भा. अंनिसची लेखी आवाहन प्रक्रिया पूर्ण करत मंत्राने कोरोना आजार बरा करा आणि यज्ञाने ऑक्सिजन निर्माण करून दाखवा. असे जाहीर आव्हान त्यांनी बोलताना दिले .

लस घेतल्याने कुठलेही चुंबकत्व शरीरात निर्माण होत नाही . या दाव्याची पोलखोल करत. तसे कसे केल्या जाते . त्यामागील शास्त्रीय कारण स्पष्ट करत त्यांनी स्वतःच्या कपाळावर नाणे चिकटवून दाखवले. अनेक संदर्भ आणि अंधश्रध्दांवर त्यांनी यावेळी आपली स्पष्ट भुमिका मांडत , नागरिकांनी कुठल्याही अंधश्रध्दांच्या आहारी न जाता वैद्यकीय उपचार , लस घेण्याचे आवाहन पंकज वंजारे यांनी केले. कोरोना आजाराची भीती व त्यातून जनतेची होणारी दिशाभूल थांबवण्यासाठी हे व्याख्यान आयोजित करत असल्याचे , कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अ. भा. अंनिस औरंगाबाद शाखेचे जिल्हा संघटक पंकज देशमुख यांनी सांगितले.

यावेळी रवींद्र वाकोडे, राजकुमार कांबळे, रावसाहेब जारे, गंगासागर सुदावले, आकाश इंगळे, संदीप त्रिभुवन, मुश्ताक शेख, यासह आदी उपस्थित होते.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.