भाजपकडून राज्यसभा निवडणुक लढण्याची घोषणा

राजीव सातव यांच्या निधनानं राज्यसभेची जागा रिक्त

भाजपकडून राज्यसभा निवडणुक  लढण्याची घोषणा

मुंबई : राज्यसभेच्या सहा जागासाठी पोटनिवडणुक येत्या ६ ऑक्टोबर रोजी निवडणुक होणार आहे. त्यात महाराष्ट्रातील एका जागेचा समावेश आहे. या पोटनिवडणुकीत भाजपकडून संजय उपाध्याय ही जागा लढवणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत घेत संजय उपाध्याय यांचे नावांची घोषण केली आहे.संजय उपाध्याय हे मुंबई भाजपचे सरचिटणीस आहेत. उपाध्याय येत्या २२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता फॉर्म भरणार असल्याची घोषणा भाजपनं केली आहे.

कोण आहेत संजय उपाध्याय
संजय उपाध्याय यांच्या राजकारणाची सुरुवात भाजयुमोपासून झाली. काही काळ ते भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवरही होते. आता ते भाजपचे मुंबई सरचिटणीस आहेत. तसेच उत्तर भारतीयांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपाध्याय यांना राज्यसभेवर पाठवण्याचा भाजपने घेतल्याचं सांगितलं जात आहे.

राज्यसभेच्या ६ रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर
राज्यसभेच्या एकूण ६ रिक्त जागांसाठी ही पोटनिवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेचा समावेश आहे. तर मध्यप्रदेशातील एका जागेचा, पश्चिम बंगालमधील एका जागेचा, तमिळनाडूमधील दोन रिक्त जागांचा समावेश आहे. आयोगाकडून प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे. या निवडणुकीची अधिसूचना १५ सप्टेंबरला जारी होणार आहे. या जागांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. तर ४ ऑक्टोबरला मतदान होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर होईल.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.