
लातूर: मुंबई -पुणे महामार्गावर झालेल्या अपघातात लातूर जिल्ह्यातील अहमदपूर मधील (वंजारवाडी ) गावचे 5 तरुण अपघातात ठार झाले.अपघात ग्रस्त कुटुंबियांना धीर देण्यासाठी 'एक हात मदतीचा ' या संकल्पनेतून भागवताचार्य कैलास महाराज मद्दे यांनी भागवत कथेतील श्रीकृष्ण-रुक्मिणी विवाह प्रसंगी जमलेली आहिर रुपी मिळालेली दक्षणा 11085/रुपये रविशंकर चोले, नारायण दादेवाड, प्रविण आरदवाड, पांडुरंग चिमले यांच्याकडे जमा केली.