भाई"गिरी" हरकत

राहुल गांधी एक मनोरंजन करणारा नेता अशी त्यांची प्रतीमा निर्माण झाली. 'जसा राजा तशी प्रजा' याप्रमाणे काँग्रेसमधली इतर मंडळीही अशाच चुका करु लागली आहेत.

भाई"गिरी" हरकत

महाराष्ट्रः काँग्रेसच्या नेत्यांनी खासीयत म्हणजे काहीही घटना असो, ते चुका करतात. आजपर्यंत काँग्रेसच्या नेत्यांमधे चुका करण्याचं कंत्राट केवळ त्यांचे माजी आणि भावी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे आहे. राहुलजी चुका करायचे, त्यांच्या बोलण्याने अनेकांच मनोरंजन होत होतं. राहुल गांधी एक मनोरंजन करणारा नेता अशी त्यांची प्रतीमा निर्माण झाली. 'जसा राजा तशी प्रजा' याप्रमाणे काँग्रेसमधली इतर मंडळीही अशाच चुका करु लागली आहेत. लातुरचे पालकमंत्री आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी फेसबुकवर ९ ऑगस्ट क्रांतीदिनाला एक पोस्ट टाकली. ९ ऑगस्टला "चले जावची" घोषणा देण्यात आली आणि ती १९४२ ला दिली त्यामुळे १९४७ ला देशाला स्वातंत्र्य मिळालं. चले जावची घोषणा दिल्याने भारत स्वतंत्र झाला असं आपण काही काळासाठी मान्य करु. पण चले जावची चळवळ आणि "सायमन गो बॅकचा" दिलेला नारा,यात किती मोठं अंतर आहे. सायमन गो बॅकची घोषणा लाल बाल पालच्या काळात दिली गेली होती तीला थेट १९४२ शी जोडण्याचं काम अमित देशमुकांनी केलं.

मुळात या घटनेचा आणि १९४२ चा काय संबंध. पण तरीही राज्याच्या वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी आपल्या फेसबुक पेजवर सायमन गो बॅकचा नारा देऊन टाकला. अमित देशमुख अशा चुका करतच असतात त्यामुळे त्यांची चुक आपण सोडुन दिली. तरी देशमुखांच्या नंतर पुढे भाई जगताप आले. भाई जगताप तर चुका करण्यात माहिर आहेत, स्वतःचच हसं करुन घ्यायची सवय त्यांना हल्ली लागलेली दिसते. एक विचारधारा असलेला, चळवळीतुन आलेला, वैचारिक माणुस अशी भाई जगतापांची ओळख आहे, पण तेही आता चुका करु लागले आहेत. भाई जगताप बैलगाडीवर बसले, एकटेच नाही तर त्यांनी आपले अनेक कार्यकर्ते त्या गाडीत बसवले. त्या कार्यकर्त्यांचा भार बैलांना सोसला नाही आणि गाडी पडली, सगळे कार्यकर्ते खाली पडले. असं होणार म्हटल्यावर हसं तर होणारच.

भाई जगतापांनीच ऑलिम्पीकच्या वेळी एक ट्विट केलं होतं, 'लांब फेकण्याची क्षमता असलेला खेळाडू आपण पाठवलाच नाही त्यामुळे भारताला सुवर्ण मिळालं नाही.' असं त्यांनी त्यात लिहीलं. त्यांच हे विधान अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी होतं परंतु त्याचा एकाच दिवसानंतर फेकाफेकीच्याच म्हणजेच भाला फेक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळालं. भाईंनी असं म्हटल्यावर बाकीचे लोकही हुशारच आहेत, त्यांनी सांगितलं की "निरजने भाल्याला आलु लाऊन फेकला होता त्यामुळे गोल्ड आलं." भाई त्यांच्या एका ट्विटमुळे उगाच ट्रोल झाले. त्यांनीही अमित देशमुखांप्रमाणे ऑगस्ट क्रांतीदिनाची पोस्ट केली. रिंगण वारीत असतं मात्र भाईंनी ऑगस्ट क्रांतीदिनाच्या दिवशी रिंगणाची पोस्ट टाकली. हे रिंगण समलिंगी पुरुषांच होतं आणि हे समलैंगिक पुरुष समलैंगिक संबंधांच्या वेगवेगळ्या पोजमध्ये रिंगण देऊन बसले आहेत असा फोटो भाईंच्या फेसबुकवर पडला तेही ऑगस्ट क्रांतीदिनाच्या पोस्ट सोबत.

अकाऊंट हॅक होऊन ती पोस्ट पडली आहे असा दावा भाईंनी केला. त्यांनी ती पोस्ट काढून टाकली, तोपर्यंत अनेकांनी तो फोटो शेअर केला होता. तो प्रचंड व्हायरल होऊ लागला आणि भाईंना त्यावर खुलासा करण्याची वेळ आली. ते म्हणाले अकाऊंट हॅक झालं होतं आणि आम्ही ते पुन्हा नीट केलं. अशा चुका काँग्रेसी मंडळी करु लागली आहेत आणि हीच खरी अडचण होते आहे. वारंवार असं करुन हे लोक आपलंच हसं करुन घेतात, अमित देशमुख असो, भाई जगताप किंवा स्वतः राहुल गांधी यांच्या चुका लोकांच मनोरंजन करत आहेत. त्यामुळे अशा चुका काँग्रेसने थांबवाव्या अशी आशा आहे.

  • सुशील कुलकर्णी

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.