भाजपने दुधाचे राजकारण करु नये –बच्चू कडू

1 min read

भाजपने दुधाचे राजकारण करु नये –बच्चू कडू

केंद्र सरकराने नुसती बघ्याची भूमिका घेण्याऐवजी काही खारीचा वाटा उचलावा.

स्वप्निल कुमावत: राज्यभर शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळावा म्हणून आंदोलन चालू आहे. या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. पण भाजपने दुधाचे राजकारण करु नये. भाजपच्या काळात विदर्भातील शेतकऱ्यांला काय भाव मिळाला ते विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे. असा प्रश्न प्रहारचे अध्यक्ष व राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे.
राज्याबरोबर केंद्राने देखील दुधाला अनुदान देण्यासाठी खारीचा वाटा उचलावा त्यासाठी काही करता आले तर भाजपने करावे. केंद्राकडून निधी आणता आला तर आम्ही आपल्या सोबत आहोत. केंद्र सरकराने नुसती बघ्याची भूमिका घेण्याऐवजी काही खारीचा वाटा उचलावा. भाजपची सत्ता असलेल्या राज्यात काय परिस्थिती आहे. तेथे किती अनुदान दिले जाते. ते देखील पाहवे. नुसत राजकारण म्हणून आंदोलन करु नये. असे बच्चू कडू यांनी म्हटले.
भाजपच्या काळात विदर्भाचे मुख्यमंत्री असताना विदर्भातील शेतकऱ्यांना काय भाव मिळाता त्या विरोधीपक्षनेते यांनी आम्हाला सांगावे. भाजपने केंद्रकडून खारीचा वाटा कसा भेटेल यासाठी प्रयत्न करावा. असा सल्ला देखील बच्चू कडू यांनी भाजपला दिला.