भाजपची कार्यकारणी जाहीर.

1 min read

भाजपची कार्यकारणी जाहीर.

पंकजा मुंडे,तावडे, खडसे यांना स्थान नाही.

मुंबई: भाजपने आज महाराष्ट्र भाजपा कार्यकारणी जाहीर केली आहे. 12 प्रदेश उपाध्यक्ष, 12 सेक्रटरी,6 जनरल सेक्रटरी आणि 1 कोषाध्यक्ष अशी कार्यकारणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केली. यात पंकजा मुंडे, विनोद तावडे,एकनाथ खडसे यांना स्थान देण्यात आल नाही तसेच राष्ट्रवादी मधून भाजप मध्ये आलेल्या चित्रा वाघ यांना संधी देण्यात आली आहे.
पंकजा मुंडे यांना प्रदेश कार्यकारणीत स्थान देण्यात आलं नसलं तरी त्यांना केंद्राच्या कार्यकारणीत महत्वाची जबाबदारी दिली जाईल असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

अशी असेल भाजप कार्यकारणी
भाजपाच्या कार्यकारिणीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील असणार आहे. महामंत्री म्हणून सुजित सिंह ठाकूर, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे, रवींद्र चव्हाण, श्रीकांत भारतीय, विजय पुराणिक यांची वर्णी लागली आहे. तर उपाध्यक्ष पदी राम शिंदे, जयकुमार रावल, संजय कुटे, माधव भंडारी, सुरेश हाळवणकर, प्रसाद लाड, प्रीतम मुंडे, चित्रा वाघ यांना स्थान देण्यात आलं आहे. तसेच कोषाध्यक्ष म्हणून मिहीर कोटेचा, प्रतोद माधुरी मिसाळ उमा ताई खापरे यांनी निवड करण्यात आली आहे.

भाजापाच्या सरचिटणीस पदी सुजितसिंह ठाकूर, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे, रवींद्र चव्हाण, श्रीकांत भारतीय यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये विशेष म्हणजे विधानसभा आणि विधान परिषदेची संधी हुकलेले चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील स्थान देण्यात आलं आहे.