भांगसीमाता गडावर गेलेल्या तरुणीवर बलात्कार

1 min read

भांगसीमाता गडावर गेलेल्या तरुणीवर बलात्कार

दौलताबाद पोलिसांत अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल

स्वप्नील कुमावत/औरंगाबाद: शहरापासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावर भांगसीमाता गड आहे. तिथे फिरायला गेलेल्या तरुणीला व तिच्या मित्राला दोन तरुणांनी बेदम मारहाण करत तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना 4 ऑगस्ट रोजी सांयकाळी घडली. दौलताबाद पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
भांगसीमाता गड हा परिसर आधीच निर्जर असतो. त्यात सध्या लॉकडाऊनचा काळ असल्यामुळे सहसा तिकडे कुणी जात नाही. ४ ऑगस्ट रोजी एक 20 वर्षीय तरुणी आपल्या मित्रासह गडावर फिरण्यासाठी गेली होती. सांयकाळी सहा ते साडेसाहाच्या सुमारास हे दोघे गडावर बसलेले होते. त्याच वेळी दोन तरुण तिथे आले. त्यांनी या दोघांकडे विचारपूस करुन त्यांना अचानक मारहाण करण्यास सुरुवात केली.
एका आरोपीने तरुणीला जोरात पकडले व गडाच्या एका बाजूला खोल भागात नेले. दुसऱ्या आरोपीने मुलाला लांब ओढत त्याला बेदम मारहाण सुरु केली. तसेच जिवे मारण्याची धमकी देत पकडून ठेवले, दुसऱ्या नराधमाने तरुणीला गडावरील एका खड्ड्यात नेत तोंड दाबून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेची कुठेही वाच्यता केली तर जिवे मारू, अशी धमकी देऊन आरोपी फरार झाले. याप्रकरणी मंगळवारी रात्री दौलताबाद पोलिसांत तक्रार दाखल झाली. पोलिसांनी संशयिताचा तपास सुरु केला आहे.