भावजीने केला सख्ख्या मेव्हणीवर अत्याचार

कंपनीत सोडण्याच्या बहाण्याने सोबत नेत केला 17 वर्षीय मेहुणीवर अत्याचार, हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

भावजीने केला सख्ख्या मेव्हणीवर अत्याचार

औरंगाबाद : वाळुज येथील कंपनीत नोकरीत असलेल्या अल्पवयीन मेहुणीला नोकरीच्या ठिकाणी सोडतो असे सांगून बहिणीच्या नवऱ्याने मोटरसायकलवर सोबत घेतले. वाळूजकडे जात असतानाच तिसगाव परिसरातील एका लॉजमध्ये मेहुणीला नेत अत्याचार केल्याची घटना २९ जुलै रोजी घडली आहे. या प्रकरणी सख्या भावजीवर पोस्को कायद्यातंर्गत बलात्काराचा गुन्हा हर्सुल पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

या मुलीकडे मोबाईल नसल्यामुळे चालत एका चौकात आली. त्याठिकाणाहुन एका व्यक्तीच्या मोबाईलवरून भावजीला घरी सोडण्याची विनंती केली. मात्र त्याने सोडण्यासाठी येण्यास नकार दिला. यानंतर पिडित मुलगी एका व्यक्तीच्या सोबतच घरी परतली. त्यानंतर घडलेला वृत्तांत घरी सांगितल्यानंतर हर्सुल पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. या तक्रारीनुसार सख्खा भावजी असलेल्या व्यक्तीवर पोस्को कायद्यातंर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अतुलकुमार ठोकळ करीत आहेत.

आरोपीला ३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
अल्पवयीन मेहुणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला हर्सुल पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. या आरोपीला न्यायालयात हजर केले असता, ३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.