'भीक नको पण हक्क द्या' म्हणत रिक्षाचालकांचे आंदोलन.

1 min read

'भीक नको पण हक्क द्या' म्हणत रिक्षाचालकांचे आंदोलन.

राज्य सरकारने पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेमधून रिक्षाचालकांना विनाअट 1 लाखांचे कर्ज द्यावे, दारिद्र्य रेषेखालील यादीत नाव समाविष्ट करा, पंतप्रधान आवास योजनेतून भाडेकरू रिक्षाचालकांना त्वरित घरकुल मंजूर करावीत, रिक्षाचालकांकचा घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करावीत.

कोल्हापूर: कोरोना महामारीच्या काळात सर्वच व्यवसायांवर मंदी आली आहे. या भीषण संकटांमध्ये सर्वसामान्य लोक, कष्टकरी व रिक्षाचालक देखील हतबल झाले आहेत. राज्य सरकारने रिक्षाचालकांना अनुदान जाहीर करावं, अशी मागणी आता रिक्षाचालकांकडून होत आहे. आज दसरा चौकात विविध मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली.
राज्य सरकारकडून 'भीक नको पण हक्क द्या' असं म्हणत रिक्षाचालकांनी आंदोलन केले. राज्य सरकारने पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेमधून रिक्षाचालकांना विनाअट 1 लाखांचे कर्ज द्यावे, दारिद्र्य रेषेखालील यादीत नाव समाविष्ट करा, पंतप्रधान आवास योजनेतून भाडेकरू रिक्षाचालकांना त्वरित घरकुल मंजूर करावीत, रिक्षाचालकांकचा घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करावीत, अश्या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.
कोरोनाच्या काळात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून राज्यातील सर्वच रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मुलांचा शैक्षणिक खर्च कसा चालवायचा, हा प्रश्न अनेक रिक्षाचालकांना पडलाय. रिक्षाचालकांच्या या जीवन-मरणाच्या मागण्या त्वरित विचारात घेऊन राज्य सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय रिक्षा संघटनेने केली आहे.