भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभामंडपाचे रविवारी भूमिपूजन.

1 min read

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभामंडपाचे रविवारी भूमिपूजन.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभामंडपाचे भूमिपूजन विजयादशमीच्या मुहूर्तावर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांच्या हस्ते होणार

परभणी/सिध्देश्वर गिरी : सोनपेठ  नगरपरिषदेच्या वतीने उभारण्यात  येणाऱ्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभामंडपाचे भूमिपूजन विजयादशमीच्या मुहूर्तावर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान गटनेते चंद्रकांत राठोड यांनी दिली. यावेळी सोनपेठ शहरातील नागरिकांना विकासात्मक योजनेपासून व नगरपालिकाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या योजनांपासून वंचीत राहू देणार नसल्याचे अभिवचनही त्यांनी यावेळी दिले.या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याधिकारी जयवंत सोनवणे,नगराध्यक्षा जिजाबाई राठोड,उपनगराध्यक्ष दत्तात्रय कदम,गटनेते चंद्रकांत राठोड,सारिकाताई विटेकर,नगरसेवक अँड.श्रीकांत विटेकर,योजनाताई भाडूळे,चंद्रकला तिरमले,लक्ष्मण खरात यांच्यासह सर्व नगरसेवकांनी केले आहे.
अत्याधुनिक सर्व सोयींनी युक्त सभागृह होणार

नगरपरिषदेच्या वतीने शहरात उभारण्यात आलेल्या कै.वसंतराव नाईक सांस्कृतिक सभागृह,सोमेश्वर मंदिर सभामंडप,शादीखाना सभामंडप,अहिल्याबाई होळकर  अत्याधुनिक सांस्कृतिक सभागृहाच्या धर्तीवरच याही  सभामंडपाची उभारणी होणार आहे असल्याचे कळते.

सोनपेठ शहरातील भीमगड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभामंडप उभारण्यात यावे.अशी येथील नागरिकांची नगर परिषदेच्या माध्यमातून अनेक वर्षापासून मागणी होती.त्यांची मागणी पूर्णत्वाकडे जात असून १००×६३ लाबी-रुंदी असलेले अत्याधुनिक पद्धतीचे सभामंडप उभारण्यात येणार असून यामुळे विविध कार्यक्रमांसाठी येथील नागरिकांना हे सभामंडप सोयीचे ठरणार आहे,शहरात  विविध समाजांसाठी  अनेक प्रभागांमध्ये सभामंडपाची उभारणी करण्यात आली आहे,हे ही सभामंडप त्याच पद्धतीने होणार आहे अशी प्रतिक्रिया  माजी नगराध्यक्ष गटनेते चंद्रकांत राठोड यांनी दिली.