कोरोना लसीला परवानगी देणारे परभणीचे भूमिपुत्र

कोरोना लसीला भारताचे औषध महानियंत्रक डॉ. वेणुगोपाल सोमाणी यांनी परवानगी दिली, सोमाणी हे परभणीचे भूमिपुत्र आहेत..

कोरोना लसीला परवानगी देणारे परभणीचे भूमिपुत्र

विजय कुलकर्णी / परभणी : संपूर्ण देशाला कोरोना या महाभयंकर संसर्गजन्य आजारावरील लसीची गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रतिक्षा होती. अखेर ही लस प्रत्यक्षात आली असून, त्यास भारताचे औषध महानियंत्रक डॉ. वेणुगोपाल सोमाणी यांनी परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे, सोमाणी हे परभणीचे भूमिपुत्र आहेत. ही बाब परभणीकरांसह त्यांच्या कुटुंबीयांसाठी देखील अभिमानाची बाब आहे.
दरम्यान, डॉ. वेणुगोपाल सोमाणी यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या शालेय जीवनापासून आजपर्यंतच्या प्रवासाबद्दल माहिती देऊन त्यांची ही यशस्वी वाटचाल त्यांच्यासाठी अभिमानास्पद असल्याचे सांगितले.

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी भारत सरकारने मोठा निर्णय घेत दोन लसींना मंजुरी दिली आहे. तातडीच्या वापरासाठी ऑक्सफर्ड-अ‌ॅस्त्राझेनेकाच्या 'कोविशिल्ड' आणि भारत बायोटेक कंपनीच्या 'कोव्हॅक्सिन' लसीला औषध महानियंत्रक कार्यालयाने परवानगी दिली आहे. कोरोनावरील तज्ज्ञ समितीने या दोन लसींची शिफारस डीसीजीआयकडे केली होती. त्यानुसार भारताचे औषध महानियंत्रक डॉ. वेणुगोपाल सोमाणी यांनी न‌ॅशनल मेडिकल सेंटर येथे आज (रविवारी) पत्रकार परिषद घेत या लसींना परवानगी दिल्याची माहिती दिली. कोरोना लसीबाबत निर्णय घेण्यासाठी भारत सरकारने सेंट्रल ड्रग स्टॅन्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन अंतर्गत विषय तज्ज्ञ समितीची (SEC) स्थापना केली होती. या समितीने दोन लसींची शिफारस डीसीजीआय कार्यालयाकडे केली होती. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनी आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या लसीला भारतात परवानगी मिळाली आहे. त्यामुळे, भारतात लवकरच लसीकरण सुरू होणार आहे.

विशेष म्हणजे, कोरोनावरील दोन्ही लसी भारतीय बनावटीच्या आहेत. याचा सर्व भारतीयांना अभिमान आहे. सोबतच या लसींना परवानगी देणारे भारतीय औषधी नियंत्रण विभागाचे प्रमुख हे परभणीचे असल्याने परभणीकरांसाठी ही विशेष अभिमानाची बाब आहे.

शनिवारी देशभरातील अनेक रुग्णालयांत कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात आली. लसीकरण करताना येणाऱ्या अडचणी, लसीची साठवणूक आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण योग्य पद्धतीने झाले आहे का? याची चाचपणी करण्यात आली. ऐनवेळी लसीकरणात कोणत्या अडचणी येतात, त्या शोधून त्यावर काम करण्यासाठी ही रंगीत तालीम होती. भारतामध्ये एक कोटीपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.