औरंगाबाद मध्ये शिवसेनेला मोठा धक्का, राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेच्या मातब्बर नेत्यांचा मनसेत प्रवेश,मनसेत इंनकमिंगला सुरूवात.

माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे निकटवर्तीय राजू खरे हे देखील मनसेत,औरंगाबाद मधील शिवसेना, भाजप व हिंदुत्ववादी संघटना मधील मातब्बर नेत्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश.

औरंगाबाद मध्ये शिवसेनेला मोठा धक्का, राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेच्या मातब्बर नेत्यांचा मनसेत प्रवेश,मनसेत इंनकमिंगला सुरूवात.

औरंगाबाद: औरंगाबाद(संभाजीनगर) हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जायचा पण याच बालेकिल्ल्याला मनसेने सुरूंग लावले आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे,जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद मधील शिवसेना,भाजप व हिंदुत्ववादी संघटनेमधील अनेक मातब्बर मंडळीनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या निकटवर्तीय राजू खरे यांनी देखील मनसेत प्रवेश केला आहे.
WhatsApp-Image-2020-08-31-at-2.03.06-PM
नुकतेच शिवसेनेतून मनसेत आले आणि थेट औरंगाबाद मनसेचे जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी मिळवलेले सुहास दाशरथे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत इंनकमिंगला सुरवात झाली आहे.
WhatsApp-Image-2020-08-31-at-2.03.04-PM
आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना,भाजप व हिंदुत्ववादी संघटनेमधील अनेक मातब्बर मंडळीनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.यामध्ये शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सिडको-हडको भागात प्राबल्य असणारे राजू खरे, भाजपचे माजी नगरसेवक नामदेव बेंद्रे,शिवसेना माजी उपशहर प्रमुख व पतित पावन संघटनेचे अध्यक्ष पै.प्रविण कडपें,जिल्हा संघटक अंकुश क्षीरसागर,कार्याध्यक्ष राजू परळीकर व शिवसेनेचे प्रशांत जोशी,रमेश मोदाणी,अरविंद जाधव यांच्यासह अनेकांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला,यावेळी मनसे नेते तथा प्रवक्ते अनिल शिदोरे व अभिजित पानसे यांची उपस्थिती होती,सर्वांनी भगव्या गांधी टोप्या घालून आज मनसेत प्रवेश केला. त्यामुळे मनसेने भगवा झेंडा घेतला व संभाजीनगर मध्ये मनसेला मोठी ताकद यापुढे मिळेल.या प्रवेशाच्या वेळी मनसेचे उपशहर अध्यक्ष गजन गौडा पाटील,संदीप कुलकर्णी,राहुल कुलकर्णी व शुभम रगडें यांची उपस्थिती होती.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.