मोठी बातमी,अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक

पोलिसांच्या कारवाईनंतर कार्यकर्ते झाले आक्रमक

मोठी बातमी,अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक

रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. राणे यांना अटक करुन नाशिक पोलिसांकडे सुपुर्द करण्यात येणार आहे. नारायण राणे स्वत: बाहेर पडले आणि आपल्या गाडीत बसले. त्यानंतर नाशिक पोलीस राणेंना घेऊन नाशिकच्या दिशेनं रवाना झाले आहे. यावेळी कार्यकर्त्यांना पोलिसांच्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना हटवलं आणि ते राणेंना घेऊन नाशिककडे निघाले.

दरम्यान, राणे यांचा जामीन अर्ज स्थानिक कोर्टाने फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. मात्र तिथेही त्यांच्या अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार देण्यात आला आहे. त्यामुळे राणे यांन तूर्त कोणताही दिलासा मिळू शकलेला नाही.

काय आहे प्रकरण?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देशाच्या स्वातंत्र्य दिनाबद्दल बोलताना केलेल्या विधानाचा संदर्भ देत नारायण राणेंनी काल एक वादग्रस्त वक्तव्य केलं होत. रायगडमध्ये नारायण राणेंनी हे चिथावणीखोर विधान केल्यानंतर महाड, नाशिक,पुणे,औरंगाबादमध्ये गुन्ह्याची नोंद झाली होती. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. ते घटनात्मक पदावर आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल केलेलं विधान हे संपूर्ण राज्याचा अपमान करणार आहे, अशी तक्रार नाशिकचे शिवसेनेचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांनी दाखल केली होती.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.