बिहार विधानसभा निवडणुकांवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर लोकजन शक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीत बिहार विधानसभा निवडणुकीस स्वतंत्रपणे सामोरे जाण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वात बिहार निवडणूक न लढवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. तथापि, लोकजनशक्ती पक्ष वर्षभरात 'बिहार फर्स्ट बिहारी फर्स्ट'च्या माध्यमातून उपस्थित झालेल्या मुद्द्यांवर माफी मागण्यास तयार दिसत नाही. तथापि, सर्व आमदार पंतप्रधान मोदींना बळकट करतील, असे पक्षाच्या वतीने जारी पत्रकात म्हटले आहे.
पक्षाच्या वतीने अध्यक्ष चिराग पासवान यांना यापूर्वीच कोणताही निर्णय घेण्यास अधिकृत केले होते. दुसरीकडे, एनडीएचे भागीदार भाजपा आणि जेडीयू आज कोणत्याही वेळी जागा वाटपाची घोषणा करण्याची शक्यता आहे. यापूर्वी एलजेपी संसदीय पक्षाची बैठक शनिवारी होणार होती परंतु पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांच्या प्रकृती बिघडल्यामुळे ही बैठक तहकूब करण्यात आली.
बिहार विधानसभा एनडीएला धक्का, लोकजन शक्ती पार्टीचा ‘एकला चलोरे’
मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वात बिहार निवडणूक न लढवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. तथापि, लोकजनशक्ती पक्ष वर्षभरात 'बिहार फर्स्ट बिहारी फर्स्ट'च्या माध्यमातून उपस्थित झालेल्या मुद्द्यांवर माफी मागण्यास तयार दिसत नाही.

Loading...