बिहार विधानसभा: मुख्यमंत्री नितीशकुमारांच्या प्रचाराचा नारळ आज फुटणार, थेट जनतेशी संवाद.

1 min read

बिहार विधानसभा: मुख्यमंत्री नितीशकुमारांच्या प्रचाराचा नारळ आज फुटणार, थेट जनतेशी संवाद.

नितीशकुमार आजपासून ते थेट जनतेशी संवाद साधणार आहेत. बांका जिल्ह्यातील अमरपूर मतदारसंघात नितीश यांची पहिली सभा होत आहे.

बिहार : बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल ​​अध्यक्ष नितीशकुमार आजपासून जाहीर प्रचार सुरू करणार आहेत. आत्तापर्यंत नितीशकुमार वर्चुअल रॅली  काढत होते, पण आजपासून ते थेट जनतेशी संवाद साधणार आहेत. बांका जिल्ह्यातील अमरपूर मतदारसंघात नितीश यांची पहिली सभा होत आहे.

नितीशकुमार म्हणाले की,  मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी मुलींना आतापर्यंत देण्यात येणारी आर्थिक मदत वाढवली जाईल. नवीन निर्णयात बारावी  उत्तीर्ण झाल्यावर प्रत्येक मुलीला 25 हजार रुपये दिले जातील, तर पदवी घेतल्यावर प्रत्येक मुलीला 50 हजार रुपये आर्थिक मदत दिली जाईल, असे नितीश म्हणाले. महिलांना आरक्षण देण्याचे काम आम्ही केले असून त्यामुळे महिलांचा सहभाग वाढला आहे. महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे जाताना दिसतात.


नितीश म्हणाले की, डिसेंबर 2018 पर्यंत प्रत्येक घरात विजेचे लक्ष्य होते, जे आम्ही ऑक्टोबरमध्ये वेळेपूर्वी पूर्ण केले होते. हा टप्पा कोरोना विषाणूचा आहे. आमच्या सरकारने यासाठी बरीच कामे केली. लॉकडाउनच्या मध्यभागी आम्ही बाहेरून क्वारंटाईनमध्ये आलेल्यांना ठेवले, त्यांना मदत केली, त्यांची चौकशी केली. आता कोरोनाचा आलेख खाली जात आहे.