बिहार निवडणुक: चिरागने पुन्हा एकदा नितीश यांच्यावर साधला निशाना, नितीश कुंआ तो तेजस्वी खाई,लोजपा भाजपा सरकार बनाई

1 min read

बिहार निवडणुक: चिरागने पुन्हा एकदा नितीश यांच्यावर साधला निशाना, नितीश कुंआ तो तेजस्वी खाई,लोजपा भाजपा सरकार बनाई

2024 मध्ये नितीश कुमार यांना पंतप्रधान व्हायचे आहे- चिराग पासवान

ईश्वर ढोके: बिहार निवडणुकीतील दुस-या टप्प्यातील मतदानाच्या अगोदर एलजेपी नेते चिराग पासवान यांनी पुन्हा नितीशकुमार यांना लक्ष्य केले आहे. चिराग यांनी आरोप केला आहे की,2024 मध्ये नितीश यांना पंतप्रधान व्हायचे आहे. बिहार विधानसभा निवडणुकीतील दुस-या टप्यातील मतदान मंगळवारी होणार आहे. यापूर्वी लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी राज्याचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना लक्ष्य केले आहे.तसेच एलजेपीने नवीन नारा दिला आहे.‘नीतीश कुआं तो तेजस्वी खाई, लोजपा-भाजपा सरकार बनाई’
नितीशकुमार यांच्या सांगण्यावरुन मुंगेरमध्ये गोळीबार झाल्याचा आरोप चिराग पासवान यांनी केला आहे.चिराग म्हणाले की, आयकर विभागाच्या छाप्यामुळे ते परेशान आहेत.नितीशकुमार यांनी 15 वर्षापासून सुशासन बाबुचा टॅग परीधान केला होता. आता त्यांचे सत्य समोर येत आहे.
चिराग पासवान म्हणाले की नितीशकुमार दारु तस्करांची चिंता करीत आहेत,कारण पैशाच्या व्यवहाराशिवाय दारु विक्री करणे शक्य नाही. नितीशकुमार यांनी पाच वर्षात काय केले ? येणा-या काळात त्यांचा काय रोडमॅप आहे ? असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला.
चिराग नितीशकुमार यांच्यावर निशाना साधत 2024 मध्ये नितीश यांना पंतप्रधान व्हायचे आहे. माझे वडील आजारी होते तेव्हा नितीशकुमार त्यांना भेटायला गेले नव्हते,परंतु आता ते खास असल्याचे भासवत आहे. असही चिराग पासवान यांनी म्हटलं आहे.
विशेष म्हणजे चिराग पासवान यावेळी एनडीएकडून निवडणुक लढवत आहेत. ते नितीशकुमारवर सतत निशाना साधत आहेत.चिराग यांनी दावा केला आहे की,निवडणुकीनंतर भाजपा आणि एलजेपी सरकार स्थापन करतील.सरकार स्थापन झाल्यानंतर नितीशकुमार यांच्यासोबत निर्धार कार्यक्रमाची चौकशी केली जाईल.