बर्ड फ्लू; चिकन, मटन, अंडी, मासळी विक्रेत्यांची आरटीपीसीआर चाचणी

दि.13 ते 18 जानेवारी या कालावधीत चाचणी करून घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी मंगळवारी दिले आहेत.

बर्ड फ्लू; चिकन, मटन, अंडी, मासळी विक्रेत्यांची आरटीपीसीआर चाचणी

विजय कुलकर्णी /परभणी: जिल्ह्यातील चिकन, मटन, अंडी, मासळी विक्री करणा-यांची आता आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. बुधवार दि.13 ते 18 जानेवारी या कालावधीत चाचणी करून घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी मंगळवारी दिले आहेत.

तालु्क्यातील मुरूंबा येथे बर्ड फ्लूचा प्रादूर्भाव आढळून आल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व चिकन, मटन, अंडी, मासळी विक्रेत्यांची आता आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे.

महानगरपालिकेत आयुक्तांनी तर नगरपालिका व नगर पंचायतीच्या ठिकाणी मुख्याधिकार्‍यांनी दि. 13 ते 18 जानेवारी या कालावधीत विशेष मोहीम राबवून दुकानाची स्वच्छता विषयक तपासणी करावी. तसेच आरटीपीसीआर तपासणी ही करून घ्यावी. तपासणी न करणा-या विरूध्द कायदेशीर दंडात्मक कारवाई करावी, असेही आदेश जिल्हाधिका-यांनी दिलेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.