शेतक-यांच्या वतीने ग्राहक मंचात शेतकरी संघटना विनामुल्य लढणार

1 min read

शेतक-यांच्या वतीने ग्राहक मंचात शेतकरी संघटना विनामुल्य लढणार

शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे

लातूर: जिल्ह्यात यावर्षी मृग नक्षत्रात म्हणजे योग्य वेळी पेरणी योग्य पाऊस पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतक-यांनी सोयाबीनची पेरणी केली होती. बियाणे उत्पादन कंपन्याने सिडप्लॉटचे बियाणे तयार न करता आर्थिक फायद्यासाठी कंपनी व गुणनियंत्रण अधिका-यांच्या संगनमताने खुल्या बाजारातील 4 हजार रुपये क्विंटल चे सोयाबीन खरेदी करुन त्याला प्रमाणित करुन बियाणे म्हणून 10 हजार रुपयाने बोगस बियाणे शेतक-यांच्या माथी मारले आहे, यामळे बियाणे उगवलेच नाही शेतक-यांना दुबार पेरणी करावी लागली. शेतक-यांनी दुकानदाराकडे बियाणे उगवले नसल्याची तक्रार केल्यावर काही शेतक-याला पुन्हा बियाणे दिले गेले पण तेही उगवले नसल्याने काही शेतक-यांला तर तिस-यांदा पेरणी करावी लागली आहे, बियाणे कंपनी व गुणनियंत्रण अधिका-यांमुळे शेतक-यांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे.
म्हणून जिल्ह्यातील बियाणे उगवण न झाल्याची तक्रार दिलेल्या सर्व शेतक-यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी संघटना ग्राहक मंचात विनामुल्य लढणार आहे.
या लढाईत जिल्हयातील बरेच वकिल पुढे येउन ही केस लढणार आहेत. यामुळे या लढाईत शेतकरी संघटनेला मदत होणार आहे. तक्रार व पंचनामा झालेल्या शेतक-यांनी बियाणे पावती,पंचनामा कॉपी, सातबारा आठ (अ) हे कागदपत्र अँड.विठ्ठल आदित्य यांचे कार्यालय शिवाजी चौक, शिवनेरी हॉटेल लातूर येथे लवकरात लवकर जमा करावेत असे आव्हान शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे यांनी केले आहे.