फडणवीसांवर भाजपने पुन्हा दाखवला विश्वास, सोपवली 'ही' जबाबदारी

भाजपने पाच राज्यांसाठी केली निवडणूक प्रभारींची घोषणा

फडणवीसांवर भाजपने पुन्हा दाखवला विश्वास, सोपवली 'ही' जबाबदारी

मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपकडून मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची पार्श्वभूमीवर भाजपने तयारी सुरू केली असुन यासाठी पाच राज्यांच्या निवडणुकांसाठी आपले प्रभारी जाहीर केले आहेत. यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गोवा विधानसभेची जबाबदारी सोपवली आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पाचही राज्यांच्या निवडणूक प्रभारींची घोषणा केली आहे. त्यात देवेंद्र फडणवीस यांच्यावर गोवा राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. फडणवीस हे भाजपचे गोवा विधानसभा निवडणूक प्रभारी म्हणून काम पाहतील यावेळी फडणवीस यांच्यासोबत जी. किशन रेड्डी आणि दर्शना जर्दोश यांच्याकडे सह प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.