गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक

औरंगाबाद जिल्ह्यात १४४ कलम लागू असतांनाही शहरातील भाजप नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला डावलून सिडको चौकात आंदोलन केले. या आंदोलनात सोशल डिस्टंसिंगला केराची टोपली दाखविण्यात आली.

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक

सुमित दंडुके/औरंगाबाद : काल मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर १०० कोटी रुपये महिन्याला मागितल्याचे गंभीर आरोप केल्यानंतर आता महाराष्ट्रात भाजप आक्रमक झाले आहे. आज शहरातील सिडको येथील वसंतराव नाईक चौकात भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आली आहे. ४ एप्रिलपर्यन्त प्रत्येक शनिवार आणि रविवार कडक लॉकडाऊन करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांचे असताना देखील भाजपच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात खा.डॉ.भागवत कराड, आ.अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केनेकर यांच्यासह भाजप महिला मोर्चा, भाजप विद्यार्थी आघाडी यांच्यासह पदाधिकारी-कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच गृहमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न यावेळी आंदोलकांकडून करण्यात आला. यावेळी पोलीस आणि आन्दोलकांमध्ये मोठ्या प्रमाणात झटापट झाली.
add-today
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी आंदोलकानी लावून धरली होती.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष संजय केनेकर म्हणाले, 'हे तिघाडी सरकार अतिशय भ्रष्ट सरकार आहे, गृहमंत्री तो सिर्फ झांकी है असली घोटाळे बाहर निकलना अभी बाकी है' अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.

आ.अतुल सावे यावेळी म्हणाले, 'तिघाडी सरकार हे बिघाडी सरकार आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांवर अश्याप्रकारचे गंभीर आरोप होत असेल तर राज्यातील जनतेसाठी ही अतिशय गंभीर बाब आहे. मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा अन्यथा आम्ही आंदोलन आणखी तीव्र करू.'


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.