भाजपकडून पदवीधर मतदारसंघाचे तिकीट जाहीर.

1 min read

भाजपकडून पदवीधर मतदारसंघाचे तिकीट जाहीर.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून शिरीष बोराळकर यांना तिकीट देण्यात आले आहे.

नवी दिल्ली : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या चार उमेदवारांची नावे निश्चित केल्याची माहिती आहे. शिरीष बोराळकर, संग्राम देशमुख, संदीप जोशी आणि नितीन धांडे यांना भाजपने तिकीट दिले आहे.पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपतर्फे संग्राम देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संग्राम देशमुख सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत.औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून शिरीष बोराळकर यांना तिकीट देण्यात आले आहे. भाजपत इच्छुकांची संख्या मोठी होती. प्रविण घुगे ओबीसी आणि दुधगावकर मराठा तसेच बसवराज मंगरूळे लिंगायत यांना डावलत ही उमेदवारी देण्यात आल्याने आता ही  मंडळी काय भुमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

ओबीसी वर्ग भाजपला मदत करेल ती बच्चू कडूच्या उमेदवरांच्या मागे राहिल असा प्रश्न विचारला जातो आहे.नागपूर पदवीधर मतदारसंघातून विद्यमान महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संदीप जोशी यांनी याआधीच आपण महापालिका निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते.अमरावती शिक्षक मतदारसंघातून नितीन धांडे यांंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महाविकास आघाडीतर्फे कोणत्या उमेदवारांचा सामना भाजपला करावा लागणार, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.