औरंगाबादमध्ये भाजपतर्फे ओबीसींचा विभागीय मेळावा

शहानुरमियाँ दर्गा परिसरातील श्रीहरी पॅव्हेलियन येथे सकाळी ११ वाजता हा मेळावा घेण्यात येणार आहे.

औरंगाबादमध्ये भाजपतर्फे ओबीसींचा विभागीय मेळावा

औरंगाबाद : ओबीसी आरक्षणावरून चालढकलपणा करणाऱ्या राज्य सरकारच्या विरोधात ओबीसी समाजात जनजागृती करण्यासाठी १२ ऑक्टोबर रोजी औरंगाबादमध्ये ओबीसी मेळावा घेण्यात येणार आहे. आज झालेल्या एका पत्रकार परिषदेत ओबीसी मोर्चाचे भगवान घडामोडे यांनी यासंबंधी माहिती दिली.

या मेळाव्यातून ओबीसी आरक्षणात सरकार कसे अपयशी ठरले यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. मेळाव्यास माजी मंत्री संजय कुटे, ओबीसी मोर्चाचे योगेश टिळेकर यांच्यासह देवेंद्र फडणवीस व इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. शहानुरमियाँ दर्गा परिसरातील श्रीहरी पॅव्हेलियन येथे सकाळी ११ वाजता हा मेळावा घेण्यात येणार आहे.

राज्य सरकारने एम्पिरिकल डाटा सादर केला नाही. यासह भाजपने ओबीसी मोर्चाविषयी आवाज उठवल्यानंतर आयोग स्थापन केला. मात्र आयोगाला आता सरकार कामच करू देत नाही, असा आरोपही ओबीसीचे नेते भगवान घडामोडे यांनी केला आहे. राज्य सरकारमधील ओबीसी समाजाच्या मंत्र्यांची निर्णय घेण्याची क्षमता असतानाही ते मेळावे तसेच रस्त्यावर उतरण्याची भाषा करू लागले आहे. त्यांच्यात क्षमता आहे. त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयी निर्णय घेण्याची गरज असताना ते अशी भाषा करीत ओबीसी समाजाला खेळवत ठेवण्याचं काम हे लोक करत असल्याचा आरोपही घडामोडे यांनी केला. म्हणून ओबीसी समाजाला जागृत करण्यासाठी आम्ही एक मोहीम यात्रा हाती घेतली आहे. असेही घडामोडे यांनी यावेळी सांगितले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.