भाजप लोकशाही मूल्यांची विटंबना करतय- खा.राजीव सातव.

1 min read

भाजप लोकशाही मूल्यांची विटंबना करतय- खा.राजीव सातव.

भाजप हे लोकशाही मूल्यांची विटंबना करत आहे, आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलने करत आहोत.

नवी दिल्ली: राज्यसभेत कृषी विधेयकाच्या विरोधात विरोधी खासदारांनी वेलमध्ये येऊन गोंधळ घातला आणि रुल बुक फाडण्याचा प्रयत्न आणि उपसभापती हरीवंश यांच्यासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी राज्यसभचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी गोंधळ घालणाऱ्या आठ खासदारांचे सात दिवसांसाठी निलंबन केले. यात महाराष्ट्रातील राज्यसभा खासदार राजीव सातव यांचाही सामावेश आहे. याचा विरोध करत संसद भवन परीसरातील महात्मा गांधींच्या पुतळ्या समोर बेमुदत आंदोलन करत लढा देत आहेत.
WhatsApp-Image-2020-09-21-at-4.33.51-PM--1-
काय म्हणाले राजीव सातव?
‘सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा राज्यसभेत विरोध केला म्हणून सरकारने माझ्यासकट अनेक खासदारांना थेट निलंबित केलं. लोकशाही मूल्यांची विटंबना करण्याचा भाजपाने निर्धार केला आहे, तर संसद भवन परीसरातील महात्मा गांधींच्या पुतळ्या समोर आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी बेमुदत आंदोलनाने हा लढा देत आहोत. आता लढा अधिक तीव्र केला असल्याचे राजीव सातव म्हणाले.