आपल सरकार येणार आहे असं आमदारांना सांगून भाजप नेते दिवस काढत आहेत-एकनाथ खडसे

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंचा भाजपला टोला..

आपल सरकार येणार आहे असं आमदारांना सांगून भाजप नेते दिवस काढत आहेत-एकनाथ खडसे

मुंबई : 'भारतीय जनता पक्षाच्या आमदारांमध्ये किती अस्वस्थता आहे हे मला चांगलच माहीत आहे. थोडे दिवस थांबा, आपलं सरकार येणार आहे असं आमदारांना सांगून भाजपचे नेते दिवस काढत आहेत,'अस म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी भाजपला टोला हाणला आहे.

'फडणवीस हे आजही सत्ता स्थापन करण्यासाठी तळमळत आहेत. त्यांनी अस्वस्थतेतूनच अजित पवारांसोबत सत्ता स्थापन केली होती. चंद्रकांत पाटलांनी यापूर्वी सरकार पाडण्याच्या दोन तारखा दिल्या होत्या. फडणवीसांनीही तारीख निश्चित केली होती. मात्र, काहीही होत नाही. उलट दिवसेंदिवस हे सरकार मजबूत होत आहे. विरोधक वाट बघत आहे आणि ते वाटच बघत राहतील, भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. आज भाजपचे आमदार असलेल्या अनेकांना मीच पक्षात प्रवेश दिला होता. त्यांना तिकीटही मीच मिळवून दिलं होतं. त्यामुळं ते माझ्याशी मोकळेपणानं बोलतात. पक्षाच्या नेत्यांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त करतात.' असं खडसे म्हणाले. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.