मराठ्यांना भाजपनेच काळा दिवस दाखवला

हरीभाऊ राठोड यांचा आरोप, 15 ऑक्टोबरला राज्यभर डफडा बजाओ आंदोलन

मराठ्यांना भाजपनेच काळा दिवस दाखवला

सिध्देश्वर गिरी/प्रतिनिधी: भाजप सरकारने मराठ्यांना आरक्षण देण्याचा अधिकार राज्यांकडून हिरावून घेतला आहे. या निर्णयामुळे 9 सप्टेंबर हा दिवस मराठा समाजाने काळा दिवस घोषित केला. या समाजावर ही वेळ भाजपच्या केंद्र सरकारमुळे आणि महाराष्ट्राच्या तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारमुळे आली, असा आरोप भटक्या-विमुक्तांचे, ओबीसी समाजाचे नेते तथा मा.खासदार हरिभाऊ राठोड यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान,बंजारा आरक्षण किंवा क्रिमीलेयर,बढतीमधील आरक्षण,तांडा सुधार असे प्रश्न प्रलंबित आहेत. यासारख्या प्रश्नावर गोरबंजारा समाजाला न्याय मिळण्यासाठी दि.१५ ऑक्टोबर रोजी डफडा बजाओ आंदोलन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
१५ ऑक्टोबर रोजी ठाण्यातील डफडा आंदोलनामध्ये मा.खा.हरीभाऊ राठोड हे सहभागी होत आहेत. या संदर्भात माहिती देण्यासाठी बोलावल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, केंद्र सरकारने २०१८ मध्ये राष्ट्रीय मागास आयोगाला संविधानिक दर्जा देण्यासंदर्भात कायदा मंजूर केला. याअंतर्गत संविधानाच्या काही अनुच्छेदामध्ये सुधारणा करण्यात आली. राज्य सरकारला एसईबीसी घोषित करण्याचे अधिकार काढून घेण्यात आले. तो अधिकार संसदेला बहाल करण्यात आला. त्यामुळे आता कुठल्याही राज्याला एखाद्या समाजास ओबीसीमध्ये घ्यायचे झाल्यास संसदेत बिल आणावे लागणार आहे. वास्तविक संविधानाच्या अनुच्छेदात सुधारणा करण्यासाठी बिल राज्यसभेत चर्चेला आले होते. यावर जनतेकडून सूचना व हरकती मागविल्या होत्या. त्याचवेळी आपण दुरुस्ती सुचविली होती. या सूचनेचा राज्यसभेच्या सिलेक्ट समितीने गांर्भीयाने विचार केला नाही,असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
या दुरुस्ती संदर्भात गांर्भीयाने विचार झाला असता. तर आज मराठा समाजावर ही वेळ आली नसती, असेही ते म्हणाले. भाजप सरकारमुळे मराठा आरक्षणावर संकट ओढवले असले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार शरद पवार, उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण हे मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आपण सुचविलेली सुधारणा याकरीता करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आरक्षणाचा मुद्दा लवकरच मार्गी लागणार आहे.
मराठा आरक्षणासाठीचा फार्म्युला मी या सरकारला देणार आहे. दरम्यान,भटक्या-विमुक्तांच्या प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी सरकार दरबारी अनेक सातत्याने पाठपुरावा केलेला आहे. मात्र अद्यापही बंजारा आरक्षण किंवा क्रिमीलेयर,बढतीमधील आरक्षण,तांडा सुधार असे प्रश्न प्रलंबित आहेत. यासारख्या प्रश्नावर गोरबंजारा समाजाला न्याय मिळण्यासाठी दि.१५ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर तहसीलदार कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डफडा-बजावो आंदोलन करून सरकारला जागे करण्यात येणार आहे. प्रत्येक शहरातील आंदोलनात बंजारा-ओबीसी-भटक्या-विमुक्त समाजाने मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन राठोड यांनी केले आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.