मंदिरे उघडण्यासाठी भाजप अध्यात्मिक आघाडी आक्रमक

लवकर मंदिरे उघडण्याचा निर्णय झाला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करू- तुषार भोसले

मंदिरे उघडण्यासाठी भाजप अध्यात्मिक आघाडी आक्रमक

औरंगाबाद : गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे बंद आहेत. कोरोना रुग्णसंख्या आता कमी झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने निर्बंध शिथील केले आहेत. परंतू मंदिरे सुरु करण्याचा कुठलाही विचार राज्य सरकार करीत नाही. यामुळेच आज भाजप अध्यात्मिक आघाडीच्या वतीने वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिर येथे आंदोलन करण्यात आले.

यावेळी बोलताना भाजप अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले म्हणाले, आम्ही आता मुख्यमंत्र्यांना नाही तर महादेवाला साकडं घालू की, या सरकारला सद्बुद्धी दे. देवा तुझी कवाड भाविकांसाठी खुली कर. राज्य सरकार मदीरालय खुली करत आहे. पण मंदिरं मात्र बंद ठेवत आहे. हा आमच्यावर अन्याय आहे. ज्या लोकांचे रोजगार तीर्थक्षेत्रावर अवलंबून आहे त्यांचा विचार सरकारने करावा. अजूनही लवकरात लवकर मंदिरे उघडण्याचा निर्णय झाला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करू, असा इशारा त्यांनी सरकारला दिला.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.