ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा बाजी मारणार - आ.लोणीकर

परतूर, मंठा व जालना या तिन्ही तालुक्यातील ७७ ग्रामपंचायती निवडून येतील असा ठाम विश्वास माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला.

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा बाजी मारणार - आ.लोणीकर

सुरेश शिंदे / जालना : परतूर विधानसभा मतदारसंघांमध्ये १०० ग्रामपंचायतींची निवडणूक सद्यस्थितीत सुरू आहे. या सर्व ग्रामपंचायतींमध्ये मोठ्या प्रमाणावर निधी देऊन प्रत्येक गावाचा शाश्वत विकास करण्याचा प्रयत्न केला असून विविध विकास कामांच्या जोरावर परतूर विधानसभा मतदारसंघातील परतूर मंठा व जालना या तिन्ही तालुक्यातील ७७ ग्रामपंचायती निवडून येतील असा ठाम विश्वास माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला.

जालन्यात आयोजित बैठकी दरम्यान माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर यांनी संपूर्ण विधानसभा क्षेत्रातील शंभर ग्रामपंचायतीचा आढावा घेतला. यावेळी युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर, दत्तात्रय आर्दड, परतुर तालुकाध्यक्ष रमेश भापकर, प्रा.सहदेव मोरे पाटील यांची उपस्थिती होती.

परतूर विधानसभा मतदार संघातील सर्वच ग्रामपंचायतीचा आढावा घेताना लोणीकर यांनी गाव निहाय सविस्तर चर्चा करत त्या गावातील सकारात्मक सर्व बाबींचा देखील विचार केला त्या त्या गावातील भाजप पुरस्कृत सर्व पॅनल बाबत सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली.

शेगाव ते पंढरपूर दिंडी मार्ग, परतूर वॉटर ग्रिड, मंठा वॉटर ग्रीड, दोनशे गावांमध्ये करण्यात आलेले डांबरीकरणाचे रस्ते, गावागावात देण्यात आलेले आरो फिल्टर, विजेचे निर्माण केलेले जाळे, सिमेंट रस्ते यासह संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी बांधकाम कामगार यासह अनेक विभागात केलेल्या विकासकामांच्या माध्यमातून ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये देखील जनता भाजपच्या पुरस्कृत पॅनल निवडून देतील असा ठाम विश्वास यावेळी लोणीकर यांनी व्यक्त केला.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.