पीकविम्याच्या मागणीसाठी भाजपचे आंदोलन

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर निदर्शने...

पीकविम्याच्या मागणीसाठी भाजपचे आंदोलन

परभणी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याची हक्काची रक्कम संबंधीत रिलायन्स कंपनी व राज्य सरकारने पेरणीपुर्व तातडीने वितरीत करावी, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या ग्रामीण जिल्हा शाखेच्या वतीने मंगळवार दि.८ रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

यावेळी भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील जुना पेडगाव रस्त्यावरील कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता ठाण मांडून पीकविम्याच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली. संतप्त कार्यकर्त्यांनी यावेळी काळे झेंडे व फलकही आणले होते. हक्काचा पीकविमा दाबून ठेवणार्या रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीचा धिक्कार असो, पीक विमा आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा, पीक विम्याची रक्कम द्या अशी घोषणाबाजी करीत भाजपा कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.

जिल्हाध्यक्ष डॉ.कदम, बाळासाहेब जाधव, शिवाजीराव मव्हाळे, समीर दुधगावकर, बाळासाहेब भालेराव, सुरेश भुमरे,अप्पासाहेब कदम, बाळासाहेब शिंदे, राजेश बालटकर, नवनाथ सावंत, तुकाराम मुंडे, अशोक मुंडे, विष्णु शिंदे, त्र्यंबक मुंडे, बापू मुंडे, गणेश मुंडे, तुकाराम वाळके, शिवसांब लांडगे, विशाल बलोटे, महेश बलोटे, लक्ष्मीकांत बंडेवार, हनुमंत मुंडे,शंभूदेव मुंडे,दामोदर तांदळे, दामोदर ठाकूर, सुशील रेवडकर, विश्‍वांभर थोरवे, हेमंत शिंदे, माऊली कदम, शामसुंदर जाधव, नामदेव जाधव, तुकाराम जाधव, कृष्णा जाधव, नंदकिशोर जाधव, राजाभाऊ राठोड, दत्तराव जाधव, श्रीकांत कदम, बाबुराव लांडगे, विठ्ठलराव जाधव, हरिभाऊ जाधव, वशिष्ठ जाधव, राम जाध़व, अर्जुन जाधव, सतीश जाधव आदी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अंगावरील शर्टस् काढून संबंधीत कंपनीच्या प्रतिनिधी व कृषी अधीक्षक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना सुपुर्द केले. भाजपाच्या या आंदोलनाने अधिकारी चांगलेच गांगरून गेले. यावेळी ते समाधानकारक उत्तरे देवू शकले नाहीत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.