भाजपचे आंदोलन म्हणजे, 'सौ चुहे खाके बिल्ली हज को चली'

राज्यभरातील ओबीसी नेतृत्व ठरवून मोडीत काढणारा भारतीय जनता पक्ष आज राज्यभर ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करत आहे

भाजपचे आंदोलन म्हणजे, 'सौ चुहे खाके बिल्ली हज को चली'

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्दावर भाजपने राज्यव्यापी आंदोलन केले आहे. यावर राष्ट्रवादीचे काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर सडकून टिका केली आहे. भाजपचे आंदोलन म्हणजे 'सौ चुहे खाके बिल्ली हज को चली' असं ट्विट जयंत पाटील यांनी केलं आहे.

जयंत पाटील यांनी ट्वीट करून भाजपच्या आंदोलनाची खिल्ली उडवली आहे. ते म्हणाले की, 'राज्यभरातील ओबीसी नेतृत्व ठरवून मोडीत काढणारा भारतीय जनता पक्ष आज राज्यभर ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करत आहे' अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

**रोहिणी खडसे यांचा भाजपवर हल्लाबोल **

ते आंदोलन करतांना मा. खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे या ओबीसी आणि बहुजन नेत्यांचा राजकीय बळी का घेतला? हे पण सांगा ना.. असा सवाल रोहिणी खडसे यांनी भाजपला विचारला आहे.

खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे या ओबीसी नेत्यांचा राजकीय बळी का घेतला?- रोहिणी खडसे
रोहिणी खडसे यांचा देवेंद्र फडणवीसाना प्रश्न

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.