विधीमंडळ दालनात भाजपची प्रतिविधानसभा

विधिमंडळाबाहेरच अभिरूप विधानसभा भरवली

विधीमंडळ दालनात भाजपची प्रतिविधानसभा

मुंबईः विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिल्यादिवशी सभागृहात गोंधळ झाला.असुन आज अधिवेशनाचा दुसरा व शेवटचा दिवस आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आल्याने भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे.

सभागृहाचे कामकाज सुरु होण्याआधी भाजपने विधिमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन केले होते. त्यानंतर सभागृहाबाहेरच भाजपने प्रतिविधानसभा भरवत सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. तसेच, भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांना प्रतिविधानसभेच्या अध्यक्षपदी बसवण्यात आले आहे.

सभागृहात बोलू देत नसल्याचा आरोप करत भाजपने आज विधिमंडळाबाहेरच अभिरूप विधानसभा भरवली आहे. यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारविरोधात धिक्कार प्रस्ताव मांडला आहे. शेतकरी, ओबीसी, मराठा, मागासवर्गीय, विद्यार्थी या सगळ्या प्रश्नांवर आवाज उठवला तर खोट्या आरोपांखाली आमदारांना निलंबित केल जातंय. जे घडलेच नाही. ते घडले आहे असे सांगून खुर्चीवरुन खोटे बोलून आमदारांना निलंबित केले जातंय. म्हणून आज या विधानसभेत मी या सरकारच्या धिक्काराचा आणि निषेधाचा प्रस्ताव याठिकाणी ठेवतो आहे,असे फडणवीस म्हणाले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.