मंदिरं सुरु करण्यासाठी भाजपचं शंखनाद आंदोलन

शहरातील निळकंठेश्वर मंदिर परिसरात शंखनाद आंदोलन करण्यात आले.

मंदिरं सुरु करण्यासाठी भाजपचं शंखनाद आंदोलन

निलंगा : राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंदिरं खुली करण्यास अद्याप परवानगी दिलेली नाही. याविरोधात भाजपा प्रदेश अध्यात्मिक आघाडी समन्वय समितीच्या वतीने उध्दवा दार उघड म्हणत शंखानाद आंदोलन करण्यात आले.

आज राज्यभर श्रीकृष्ण जन्माष्टमी दिनी शंखनाथ आंदोलन पुकारण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील निळकंठेश्वर मंदिर परिसरात भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक आघाडी समन्वय समितीचे मराठवाडा संयोजक ज्ञानेश्वर बरमदे यांच्या नेतृत्वाखाली टाळ मृदंगाच्या गजरात आंदोलन करण्यात आले.

यावेळी मंदिरात आध्यात्मिक आघाडी समन्वय समितीच्या सर्व सदस्यानी टाळांच्या गजरात ठेका धरला.तर महाविकास आघाडीचे सरकार हे गोरगरीबांचे नसून वसूली सरकार आहे.हे सरकार निव्वळ बदल्यांच्या नावाखाली देखील आता वसूली करण्याचे काम करीत आहे.जर मंदिर खुली करायची नसतील तर बार,हाॅटेल डान्सबार दारूचे दुकाने ढाबे कशाला चालू ठेवलात असा सवाल विचारत या आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारवर टिका केली. उध्दवा दार उघड अन्यथा आम्ही स्वता उघडू अशा घोषणा देत आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी महसुल आणि पोलिस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

या निवेदनावर ज्ञानेश्वर बरमदे अंजना केंद्रे अॕड विरभद्र स्वामी शेषराव ममाळे राम पाटील रतन रेड्डी किरवले देविदार संतराम माळी माळी माधव शिंदे माणिक बिरादार शाम सिरसले मुरलिधर कोरे बालाजी मगर सुर्यकांत धुमान बिभीषन धुमाळ संदीपान सिरसले सदानंद पाटील महादेव रूद्रवाडे प्रल्हाद महाराज अदी आंदोलनकर्त्यांच्या स्वाक्षरी आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.