मुख्यमंत्रीपद वाचण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या घरी काळा जादू? नितेश राणेंचा गंभीरआरोप

मुख्यमंत्रीपद वाचण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या घरी काळा जादू? नितेश राणेंचा गंभीरआरोप

मुंबई : राज्यात विविध ठिकाणी अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. एकीकडे राज्य सरकार अडचणीत सापडलेल्या नागरिकांची मदत करण्यात व्यस्त असताना भाजप नेते नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

नितेश राणेंनी ट्विटमध्ये म्हटलं की, स्वतःचे मुख्यमंत्री पद वाचवण्यासाठी काळा जादू आणि पूजा मुख्यमंत्री स्वतःच्या घरी करत असतात असे आम्ही ऐकतो.. तशीच आता एकदा महाराष्ट्राला शांत करण्यासाठी महापूजा करावी, जेणेकरून २८ नोव्हेंबर २०१९ ला लागलेली पणवती एकदाचीच काय ती दूर होईल, अस ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.

शुक्रवारी कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा जबरदस्त तडाखा बसला आहे. या भागातील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. तरी देखील अनेकांचं संसार उघड्यावर पडले आहे. त्यातच सरकार पुरग्रस्तांना मदत पोहोचवण्यात कमी पडत असल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात येत आहे. अशा सर्व परिस्थितीत मुख्यमंत्री घरी बसून असल्याचा आरोपही होत आहे.

दरम्यान, रायगड जिल्ह्यात दरड कोसळल्यामुळे मृत्यु पावलेल्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने प्रत्येकी ५ लखांची तर केंद्र सरकारकडून २ लाखांची मदत जाहिर करण्यात आली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.