पांढऱ्या तांदळाचा काळा बाजार,120 टन तांदूळ पकडला

1 min read

पांढऱ्या तांदळाचा काळा बाजार,120 टन तांदूळ पकडला

अन्न भाग्य योजनेतील १२० टण पेक्षाही जास्त सुमारे ३६ लाखांचा तांदूळ गरिबांच्या तोंडातुन काढून काळ्या बाजारात विक्रीसाठी

हुलसूर/एम.एस. हुलसूरकर: अन्न भाग्य योजनेतील १२० टण पेक्षाही जास्त सुमारे ३६ लाखांचा तांदूळ गरिबांच्या तोंडातुन काढून काळ्या बाजारात विक्रीसाठी निघालेले चार ट्रक बसवकल्याण चे पीएसआय गुरु पाटील, अन्न विभागाचे अधिकारी राजेंद्रकुमार तहसीलदार सावित्री सलगर यांनी सस्तापुर बंगला या ठिकाणी हे ट्रक पकडले.
अधिक माहिती अशी की, बसवकल्याण येथून राजस्थान चे ड्रायव्हर व क्लिनर हे गुजरातमध्ये चार ट्रक तांदूळ भरून घेऊन जात असताना पोलिसांनी सापळा रचून सस्तापुर बंगाला याठिकाणी यांना पकडले. ड्रायव्हर व क्लिनर याच्यासह एकूण आठ जणांना अटक करण्यात आली आहे. चार ट्रक १२० टण पेक्षा ही जास्त तांदूळ यावेळी जप्त करण्यात आला. यांच्या विरोधात बसवकल्याण सीटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.