स्वातंत्र्यदिनी पत्रकार संघाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

1 min read

स्वातंत्र्यदिनी पत्रकार संघाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या तालुका शाखेच्या वतीने स्वातंत्र्यदिनी डिग्रस कऱ्हाळे येथे होणार रक्तदान शिबीर

प्रद्युम्न गिरीकर/ हिंगोली: दि.15 ऑगस्ट रोजी हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये जास्तीतजास्त रक्तदात्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या तालुका शाखेच्या वतीने स्वातंत्र्यदिनी डिग्रस कऱ्हाळे येथे ग्रामपंचायत कार्यालय परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीत रक्ताची कमतरता असल्यामुळे तालुका शाखेच्यावतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन करण्यात येणार असून परिसरातील नागरिकांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रद्युम्न गिरीकर व हिंगोली तालुका उपाध्यक्ष पांडुरंग कराळे यांनी केले आहे.