बोलता बोलताच झोपी जातात येथील लोक...

1 min read

बोलता बोलताच झोपी जातात येथील लोक...

येथील लोकांची जीवन पद्धती जरा निराळीच आहे. कधीही आणि कुठेही झोपण्याचा आनंद हे लोक घेतात. विशेष म्हणजे कधी कधी तर बोलता बोलताही हे लोक झोपी जातात. आणि एकदा झोपले की महिना महिना यांना जाग येत नाही. झोपेतून उठल्यावरही काही आठवत नाही.

शांत झोप सगळ्यांनाच प्रिय असते. पण बदलत्या जीवन पद्धतीमुळे लोक आपली झोपच विसरून गेले आहेत. परंतू या सगळ्याला अपवाद आहेत एका देशातील लोक. ते सहज झोपी जातात आणि गाढ झोपी जातात.पण हा आजार आहे.
कजाकिस्तानातील कलाची गावातझोपण्याचा आनंद हे लोक घेतात. विशेष म्हणजे कधी कधी तर बोलता बोलताही हे लोक झोपी जातात. आणि एकदा झोपले की महिना महिना यांना जाग येत नाही. झोपेतून उठल्यावरही काही आठवत नाही. तुम्ही विचार करत असाल असे कसे होवू शकते कि, कुणी चालाता चालता किंवा गप्पा मारतानाही कसे झोपी जावू शकतात. परंतू या गावातील लोकांनी ते शक्य करून दाखवले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे यूरेनियम माइंस हॅयूरेनियम मधून निघणारया दूषित गॅसमुळे येथील लोकांच्या शरीरावर याचा परिणाम होत आहे.
मागील नऊ वर्षा पासून उपचारात अपयश
कलाची गावातील हा प्रकार सर्वात आधी २०१० साली समोर आला. यावेळी शाळेतील काही विद्यार्थी अचानक जमीनीवर कोसळले आणि झोपी गेले. हळू हळू आजारी लोकांची संख्या वाढत गेली. तेव्हापासूनच शास्ञज्ञ या आजारावर संशोधन करत आहेत, परंतू अजूनतरी त्यांच्या हाताला यश आलेले दिसत नाही. यामुळे येथील अनेक लोक दुसरया ठिकाणी स्थलांतरित होत आहे