चर्चेत कसे यायचे हे नेहा कक्कड कडूनच शिकले पाहिजे. कधी ती आपल्या विवाहाबद्दल चर्चेत आली आहे तर कधी आपल्या जुन्या घरांच्या फोटोमुळे. नुकतेच तीने एका मुलाखतीत सांगितले की, ती बॉलिवूडमध्ये कधी एंट्री करणार आहे. पण तीने यासाठी एक शर्त सुद्धा ठेवली आहे. ती पुर्ण झाली तरच ती बॉलिवूड मध्ये एंट्री करणार असल्याचे तीने सांगितले आहे. चला तर जाणून घेवूया काय आहे नेहा कक्कडची ती शर्त.
एका अहवालानुसार नेहा कक्कडने या गोष्टीचा खुलासा केला आहे की, आजपर्यंत जेवढ्या गायकांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या हाती निराशाच आली आहे. जर मी बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याचा विचार केला तर मी या गोष्टीची पुर्ण काळजी घेईल की, माझा चित्रपट हिट होईल. तेव्हाच मी चित्रपट करेल नाहीतर मी त्याला हात देखील लावणार नाही. नेहाने या गोष्टीची पुर्ण स्पष्टता व्यक्त केली आहे की, ती बॉलिवूडमध्ये येण्यासाठी फक्त एका संधीची वाट बघत आहे. विशेष म्हणजे नेहाच्या आधी अनेक बॉलिवूड गायक आणि अभिनेत्यांनी आपली किस्मत आजमवण्याचा प्रयत्न केला आहे परंतु कुणालाही यात यश मिळाले नाही. त्यापैकीच एक सोनू निगम, शान, मीका सिंह आणि हिमेश रेशमिया सारखे अभिनेते आहेत.