घराचे कुलूप तोडून दागिने लंपास

सोन्याची एकदानी व रोख १२ हजार रुपये असा एकूण ५९ हजार रुपयांचा ऐवज लंपास

घराचे कुलूप तोडून दागिने लंपास

परभणी: तालुक्यातील चुडावा पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या मौजे कौर या गावात शुक्रवार दि. 5 रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराचे दार तोडून प्रवेश केला. घरामध्ये ठेवलेले सोन्या, चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध चुडावा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथील फिर्यादी गणपत सखाराम ठाकरे हे शुक्रवारी आपल्या घरी होते. परंतु मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या बंद घराचे दार मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी तोडून घरामध्ये प्रवेश केला. घरात प्रवेश केल्यानंतर घरातील कपाटात ठेवलेले ५९ हजार रुपयांचे दागिने लंपास केले. यामध्ये सोन्याची एकदानी व रोख १२ हजार रुपये असा एकूण ५९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरी झाल्याची घटना कळताच पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. पंचनामा केला. अखेर चुडावा पोलीस ठाण्यात गणपत सखाराम ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी देवकते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.