घरात घुसून महिलेस मारहाण, सामानाची केली तोडफोड

याबाबत पिडीत महिलेने निलंगा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे...

घरात घुसून महिलेस मारहाण, सामानाची केली तोडफोड

निलंगा : महिलेच्या घरात घुसून सामानाची तोडफोड केली व मारहाण केली. याप्रकरणी सात जणांविरोधात विविध कलमानव्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना (दि.३०) मार्च रोजी सायंकाळी दादापीर नगर निलंगा येथे घडली. याप्रकरणी अजय प्रतापसिंग बहोत, करण सतिष तुसांबड, राहुल बहोत, अर्जुन बहोत, करण बहोत, आकाश बहोत, राहुल सौदा असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नावे आहेत. याबाबत पीडीत महिलेने निलंगा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीत असे नमूद करण्यात आले आहे की, फिर्यादी महिलेस पती, तीन मुली,एक मुलगा असा परीवार असुन एका मुलीचे लग्न झाले आहे. पती मोलमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवितात. मुलगा सागर हा घरीच किराणा दुकान चालवितो. दि.३० मार्च रोजी सकाळी फिर्यादीचे पती नणंद येथे मजुरी कामासाठी गेले होते. घरी फिर्यादी महिला व त्यांच्या दोन मुली होत्या. मुलगा सागर हा कोठेतरी बाहेर गेला होता. सायंकाळी ७ वाजण्याचे सुमारास गल्लीतीलच अजय प्रतापसिंग बहोत याचा मेव्हणा करण सतिश तुसांबड यांनी घरामध्ये जाऊन फ्रिज, टी.व्ही खाली पाडुन त्याची तोडफोड केली. व दुकानामध्ये जाऊन दुकानातील सामान अस्ताव्यस्त फेकुन देऊन नुकसान केले. 'तुझ्या पोराला बोलव नाहीतर तुला अन तुझ्या खानदानाला खलासच करुन टाकतो' म्हणुन त्याचे हातातील लाकडी दंडुक्याने फिर्यादी महिलेच्या डावे हाताचे कोपरावर जोराने मारुन हात सुजविला व पाठीत तसेच हातापायावर मारहाण केली.

त्यावेळी तेथे करणचे मेव्हणे अजय बहोत, राहुल पहोत, अर्जुन बहोत, करण बहोत, आकाश बहोत व अजयचा चुलत भाऊ राहुल सौदा हे सर्व जण येवुन फिर्यादीच्या घरात घुसून पुन्हा शिवीगाळ करु लागले त्यावेळी मुलींने आरडाओरड केल्याने गल्लीतील शेजारील लोक व घरासमोरुन जाणाऱ्या लोकांनी मांडण सोडविले भांडण सोडविण्यास येणाऱ्या लोकांनाही या लोकांनी तुम्ही कशाला भाडण सोडवायला आले, म्हणुन त्यांना पण आरोपींनी शिवीगाळ केली. तेवढयात त्यांचा मुलगा सागर हा घरी आला असता, अजय बहोत व त्याचे इतर भावांनी त्यास घरात घुसून तु लई माजलास का, तुझी मला मारायची हिम्मत कशी झाली म्हणुन अजय बहोत व त्याचा भाऊ करण बहोत याने सागर याच्या तोंडावर मारल्याने त्याचा डावा जबड्यावर मुक्का मार लागुन गाल सुजला. व इतर लोकांनी त्यास पाठीत, छातीवर, तोंडावर, हातापायावर लाथाबुक्याने मारहाण करुन मुक्का मार दिला. तुला तर खतम केल्याशिवाय राहात नाही म्हणुन धमकी दिली.

याबाबत फिर्यादी महिलाने दिलेल्या तक्रारी वरून, आरोपी आणि फिर्यादी हे एकच गल्लीतील रहिवाशी असून आरोपीने फिर्यादी यांच्या घरात हातात लाकडी दंडुके घेऊन तुझा मुलगा कोठे गेला आहे त्याला बाहेर काढ आज त्याला जिवंत सोडणार नाही म्हणून जबरदस्तीने घरात प्रवेश केला.फिर्यादी महिलेस ढकलून देऊन त्यांच्यावर लाकडी दंडुक्याने हमला केला.यात फिर्यादीच्या डाव्या हाताच्या कोपरावर जबर मार लागला असून यांच्या मुलालाही जबर मारहाण करण्यात आली आहे. त्यानंतर फिर्यादी यांच्या घरातील टीव्ही, फ्रीज, कपाट,व इतर संसारोपयोगी सामानाची तोडफोड करून १० हजारांचे नुकसान केले. फिर्यादी यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप आरोपीना अटक करण्यात आली नाही. पुढील तपास पोहेकाँ.पडीले हे करत आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.