विजय कुलकर्णी/परभणी : महात्मा फुले नगर परिसरामध्ये हळदी समारंभासाठी घरासमोर लावलेल्या डीजे समोर नाचणाऱ्या लोकांना मज्जाव केल्याने संतापून ९ जणांनी शेख इस्माईल शेख यांच्या घरात प्रवेश सामानाची नासधूस केली. तसेच मारहाण करून दहशत माजवल्याचा प्रकार ६ जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडला.
याप्रकरणी फिर्यादी शेख इस्माईल शेख महेबूब यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पुर्णा पोलिस स्थानकात आकाश अहिरे, अमर दिवसे, दिनेश पंडित, राहुल पवार, गौरव खंडारे, विशाल हातागले, निलेश कुलदीपक, परसोडे भैया अमोल दिवसे सर्व राहणार फुले नगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून यातील आरोपी दिनेश पंडीत, परसोडे भैया या दोघांना तात्काळ अटक करण्यात आली होती. यातील फरार ७ आरोपीं पैकी ४ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलिस करत आहेत.