बुडीत कर्ज आणि राजकीय तमाशा

आरबीआय ने केली कर्ज माफी ही हास्यास्पद बातमी वाचली. जो देतच नाही तो माफ कसा करेल? आणि कोणाची माफ केली हे समजून घेत असताना कोणी दिली आणि कधी दिली हे समजून घेणे आवश्यक आहे.

बुडीत कर्ज आणि राजकीय तमाशा

कर्ज माफी आणि बातम्यांचा बाजार

देशातील मोजक्या उद्योजकांनी बँकांच्याकडून घेतलेले कर्ज हेतुपूर्वक थकवले आहे. बुडवले आहे. सामान्य गुंतवणुकदारांचा पैसा या उद्योजकांनी लांबवला हे नागवे सत्य आहे. माफी आणि निर्लेखन या तांत्रिक शब्दांचा कितीही खेळ केला तरी हा पैसा बुडल्यात जमा आहे. हे वास्तव आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने माहितीच्या अधिकारात एक माहिती दिली आणि किती कर्जाचे निर्लेखन झाले आहे. हे प्रकाशात आले आहे. पण ही माहिती समोर येताच आपल्याकडच्या माध्यम पंडीतांनी ज्या बातम्या चालवल्या त्या देखील हास्यास्पद आहेत.
मुळात आरबीआयने दिलेली माहिती निट वाचली असती तर सगळा प्रकार लक्षात आला असता. पत्राच्या पहिल्या पानातील मुद्दा क्र तीन मध्ये ही बाब स्पष्ट होते.
तो मुद्दा जशास तसा येथे देत आहे.

Data is as repoertd by banks and RBI will not be held responsible or accontable for any misreporting and / or incorrect reporting by the reporting entities

इतकी स्पष्टता असूनही आरबीआयने कर्ज माफी दिल्याचा डांगोरा माध्यमांनी पिटला आणि तीच री पुढे समाजमाध्यमांनी पुढे रेटली. मुळात कोणत्याही गैरसरकारी संस्था आणि व्यक्ती तसेच उद्योग याला आरबीआय कर्ज देत नाहीच आणि त्यामुळे ते माफ करण्याचा प्रश्नच येत नाही.
( संदर्भ माय महानगर, नेटवर्क १८, मनी कंट्रोल आणि लोकमतच्या बातम्या)

आता जरा पुढे जाऊ मुळात कांही नवीन सापडल्याचा अविर्भाव दाखवत जुणीच माहिती मांडली जात आहे. ही कर्ज थकीत आजची अथवा या चार पाच वर्षातील नाहीत तर ती आधीची आहेत.

हे कर्ज कोण घेतले हे स्पष्ट झाले आहे कोण दिले हे फार कमी लोकांना ठाऊक आहे. त्या बँकाची यादी आणि कर्ज मिळाल्याचा दिनांक स्पष्ट केला असता तर अधिक बरे झाले असते. ते कर्जदार कधी झाले आणि फेडणे बंद कधीपासून केले हे अधिक जोरकरस पणे समोर येण्याची गरज आहे. जेव्हा ही माहिती समोर येईल तेंव्हा अनेकांचे दात आपल्याच घशात जाणार आहेत.

मुळात विलफुल डिफॉल्टर आणि राईटऑफ ही दोन शब्द समजून घेतली पाहिजेत. राईटऑफची परंपरा कधीपासून सुरू आहे कुठे कुठे आहे आणि का आहे हे देखील जाणून घेणे आवश्यक आहे.

**विलफुल डिफॉल्टर म्हणजे जाणिवपूर्वक कर्ज थकविणारा व्यक्ती आहे. मुळात ही अशी माणसे कर्ज घेतातच ती बुडविण्यासाठी आपल्या मराठवाड्यातील एक उदाहरण तुम्हाला सांगतो. एक मोठे राजकारणी आहेत. ज्यांच्याकडे खासगी आणि सहकारी साखर कारखाणे्, व्यवसाय उद्योग, दुधसंस्था, दारू कारखाणे यांचे जाळे आहे. हे प्रत्येक उद्योग त्यांनी कर्जावर उभारले आहेत. गंमतीचा भाग असा की, कंपण्याचे नाव बदलून ही मंडळी नवनवीन कर्ज घेत असतात. कधी पब्लीकेशन तर कधी इंटरप्राईजेस, कधी दुध तर कधी दारू असे करत ही मंडळी करोडो रूपयांचे कर्ज घेत राहतात. कांही फेडतात तर कांही बुडवतात. **

गंमत म्हणजे एकाही कंपनीवर (खासगी) हे डायरेक्टर नसतात. ते आपल्या पगारी नौकरांना डायरेक्टर करतात आणि स्वतः केवळ शेअर होल्डर बनून खरा मलिदा लाटत असतात. या प्रकारामुळे ते कधीच बुडीत वाल्यांच्या यादीत येत नाहीत. पण असतात खरे कर्ज बुडवे.
सहकारी बँकाकडून खासगी उद्योगाला कर्ज घेण्याची परंपरा देखील येथेच आहे.
क्षमता, मालमत्ता आणि संपत्ती असूनही कर्ज बुडविण्याची ज्यांची इच्छा असते. ते असतात विलफुल डिफॉल्टर आणि अशी मंडळी आपला प्रभाव ( सत्ता आणि राजकारण) वापरून कर्ज मिळवत आली आहेत. आणि हिच कर्ज बुडत असतात. आता ही कर्जे कोणत्या प्रभावात मिळतात हे स्पष्ट झाले तर सगळ्या बुडीत होऊ पाहणा-या कर्जांचे खरे स्वरूप आपल्या समोर येईल.
आता जरा निर्लेखन समजून घेऊ. याचा सरळ सरळ अर्थ आहे या कर्जाची खाती लिहणे बंद करणे. म्हणजे ना ही खाती एनपीए मध्ये दिसतील ना चालू खात्यात ना ही बुडीत खात्यात जातील. याची नोंद वेगळ्याच वहीत केली जाते. या कर्जाच्या वसुलीचे प्रयत्न करण्याचा पूर्ण अधिकार बँकाना असतो.
कर्ज वसुलीसाठी केसेस करणे खटला चालविणे अशी कृती झाली अटक झाली तरीही जप्त मालमत्तेमधून ही रक्कम पूर्णतः वसुल होण्याची शक्यता संपल्याने हे थकीत कर्जाचे ओझे बँकेच्या अन्य व्यवहाराला बाधीत करू शकते. म्हणूनच ही निर्लेखन करून नव्या व्यवहाराची तयारी केली जाते.
ही पध्दत मागच्या पंचविस वर्षापासून जगभरात अवलंबिली जाते हे सत्य देखील समजून घेतले पाहिजे. ही पध्दत ऑडीटर यांनी सर्टिफाईड केलेली असते.
आता ज्यांना ज्यांनी लोकांच्या बुडालेल्या पैशाची चिंता आहे. त्यांच्यासाठी आणखी एक मुद्दा देत आहे.
राज्यात जिल्हा मध्यवर्ती बँकाचे जाळे आहे. या बँका खास करून कृषी कर्ज देण्यासाठी स्थापण झाल्या आहेत. जशी आरबीआय किंवा अन्य बँकाची माहिती माहिती अधिकारांतर्गत मिळवता येते तशी या जिल्हा बँकांची मिळवता येत नाही. एक जिल्हा बँक शेकडो कोटी रूपयांचे कर्ज वाटप करत असते. ही कर्ज जिल्हा बँकेला नाबार्ड कडून मिळतात. आणि नाबार्डला पैसे आरबीआय देत असते. या जिल्हा बँकांच्या कर्जाची यादी कुठेच मिळत नाही. अगदी जिल्हाधिकारी सुध्दा ही यादी देऊ शकत नाही. लोकांच्या हजारो कोटी रूपयांची चिंता असणा-या मंडळीनी ही कर्जाची यादी मिळवावी. कोणत्या शेतक-याला, कोणत्या उद्योगासाठी किती कर्ज दिले आहे. त्याची परतफेड किती झाली आहे. किती कर्ज थकीत आहेत. किती कर्ज राईट ऑफ झालीत याची माहिती घेऊन देखील उजागर करावी. खासगी साखर कारखाने, बुडीत झालेले साखर कारखाणे आणि अन्य उद्योग यांना कर्ज दिले आहे काय? हे कर्ज किती थकीत आहेत याची किमान या पाच वर्षातील माहिती घ्यावी म्हणजे वस्तुस्थिती समोर येईल. आरबीआयने दिलेल्या यादीनुसार हजारो कोटी रूपये बुडाली आहेत हे जसे समोर आले तसे हे देखील समोर येईल.

मेहुल चोक्सी कर्जप्रकरण

गीतांजली जेम्सचा मुख्यप्रवर्तक मेहुल चोकसी यांने नोव्होबर २०१० ते एप्रील २०१४ या काळात ३१ बँकाच्या कडून ५२८० रूपये कर्ज घेतले आहे. यावेळी त्याच्याकडे केवळ १०० कोटींची मालमत्ता होती. याची लिड बँक अलाहाबाद बँक होती.
चोक्सीने इलाहाबाद बँक, आंध्रा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बड़ौदा, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, केनरा बँक, कॉरपोरेशन बँक, देना बँक, एक्सपोर्ट इंपोर्ट बँक ऑफ इंडिया, इंडियन ओवरसीज बँक, आईसीआईसीआई बँक, आईडीबीआई बँक, इंडसइंड बँक, कर्नाटक बँक, करूर वैश्य बँक, पंजाब नेशनल बँक, पंजाब एंड सिंध बँक, स्टैंडर्ड चार्टर्ड बँक, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ बीकानेर एंड जयपुर, सिंडीकेट बँक, यूनियन बँक, यूनाइटेड बँक, विजया बँक, स्टेट बँक ऑफ मॉरीशस, कैथोलिक सीरियन बँक, लक्ष्मी विलास बँक, जम्मू एंड कश्मीर बँक ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स यांच्याकडून लोन घेतले होते.

नीरव मोदी प्रकरण तर रंजक आहे.
निरव मोदीने तर कोणतीच मालमत्ता गहाण ठेवली नाही. २०११ पासून पंजाब नॅशनल बँकेसोबत हा घोटाळा सुरू आहे. एक कर्ज घेतले की ते कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज असा तो सगळा प्रकार आहे. कर्ज वाढत गेले आणि बँक बुडत गेली

**विजय मल्या लंडनला कधी पळून गेला. **
त्याची किंगफिशर विमान कंपणी कधी बुडाली आणि त्याची कर्ज कधीची आहेत. हे सत्य सर्वविदीत आहे. त्याच्यावर अनेकांचा अभ्यास झाला आहे.

रूची सोया ही कंपनी १९८६ पासून काम करते आहे. सनरिच हा हा ब्रॅड २०१४ मध्ये सुरू करण्यात आला होता.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.