शहरातील बेकायदा मालमत्तांवर बुलडोझर चालवणार- प्रशासक पाण्डेय

३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत मुदत....

शहरातील बेकायदा मालमत्तांवर बुलडोझर चालवणार- प्रशासक पाण्डेय

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेने मालमत्ताधारकांना गुंठेवारीच्या फाइल दाखल करण्यासाठी ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत मुदत दिली आहे. या मुदतीत गुंठेवारी फाइल दाखल केल्या नाहीत, तर १ नोव्हेंबरपासून बेकायदा मालमत्तांवर जेसीबी चालविला जाईल, असा इशारा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिला आहे.

शासनाच्या आदेशानुसार, गुंठेवारी भागातील जास्तीत जास्त मालमत्ता नियमित करण्यासाठी प्रत्येक वॉर्ड कार्यालयात गुंठेवारी कक्ष सुरू करण्यात आला आहे. तसेच मालमत्ता नियमित करण्याच्या फाइल तयार करण्यासाठी वास्तुविशारदांचे पॅनल तयार केले. त्यांचे शुल्क महापालिका देईल, नागरिकांवर त्याचा बोजा पडणार नाही.

यापूर्वी ३० सप्टेंबरपर्यंत असलेली मुदत आता ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे आहे. आतापर्यंत ४८० गुंठेवारीच्या संचिकांना चलन भरण्याची परवानगी देण्यात आली, यातून आतापर्यंत ४ कोटी ४४ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. गुंठेवारी मालमत्ता नियमित करण्यासाठी ६०० चौरस फुटांपर्यंतच्या निवासी बांधकामास रेडीरेकनर दराच्या ५० टक्के शुल्क आकारले जाते.

शहरात अडीच लाख घरे अनधिकृत
महापालिकेच्या हद्दीत तब्बल अडीच लाख घरे अनधिकृत असल्याची माहिती मनपाच्या नगररचना विभागातून मिळाली. या घरांमध्ये सुमारे सात ते नऊ लाख नागरिक राहतात.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.